National Women's Football
National Women's Football Dainik Gomantak
गोवा

National Women's Football: आंध्रला नमविले, हिमाचलचे राजस्थानवर 15 गोल

गोमन्तक डिजिटल टीम

National Women's Football गोव्याच्या महिलांनी मागील पराभवातून सावरताना 27 व्या राष्ट्रीय सीनियर महिला फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी विजयाची नोंद केली. गट तीनमधील लढतीत कॅरेन एस्ट्रोसियो व सुश्मिता जाधव यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर यजमान संघाने आंध्र प्रदेशचा 9-0 फरकाने धुव्वा उडविला.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या आणखी एका लढतीत हिमाचल प्रदेशने राजस्थानवर 15-0 असा प्रचंड फरकाने विजय प्राप्त केला. त्यांच्यासाठी पूनम हिने पाच, निशा हिने चार, मनीषाने तीन, अंजू हिने दोन, तर नकेता हिने एक गोल केला.

गोव्याच्या विजयात कॅरेन एस्ट्रोसियो व सुश्मिता जाधव यांनी चमकदार खेळ केला. कॅरेन हिने पाच, सुश्मिताने तीन गोल केले. अन्य एक गोल नमिता गोवेकर हिने नोंदविला. विश्रांतीला गोव्याचा संघ 6-0 फरकाने आघाडीवर होता.

सुश्मिताने अनुक्रमे सहाव्या, 17 व्या व 52 व्या मिनिटास गोल नोंदविला. कॅरेनने धडाकेबाज खेळ करताना 10 व्या, 22 व्या, 32 व्या, 49व्या व 55 व्या मिनिटास अचूक नेमबाजी साधली. नमिताने 39व्या मिनिटास गोलची नोंद केली.

गटातील ताजी स्थिती

स्पर्धेच्या गट तीनमध्ये ओडिशा व हिमाच प्रदेशने प्रत्येकी तीन सामने खेळल्यानंतर दोन विजय व एका बरोबरीसह समान सात गुण नोंदविले आहेत. दोन विजय व एका पराभवामुळे गोव्याचे सहा गुण आहेत. एक विजय व दोन पराभवामुळे आंध्र प्रदेशच्या खाती तीन गुण असून राजस्थानला चारही लढतीत पराभव स्वीकारावा लागला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

SCROLL FOR NEXT