Yuri Alemao: 'विधवांनाही आत्मविश्वासाने जगण्याचा हक्क'; आलेमाव यांचा प्रस्ताव, मंत्री राणे, मुख्यमंत्री सावंतानी दिले आश्वासन

गोव्यातील अनेक ग्रामपंचायतींनी राज्यातील विधवा भेदभावाच्या अन्यायकारक प्रथांच्या विरोधात ठराव पारित केले आहेत
Yuri Alemao
Yuri Alemao Dainik Gomantak

महिलांना समान अधिकार देण्याबाबत समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. गोव्यातील अनेक ग्रामपंचायतींनी राज्यातील विधवा भेदभावाच्या अन्यायकारक प्रथांच्या विरोधात ठराव पारित केले आहेत.

मी गोवा सरकारला विधवासोबत होणारे भेदभावाच्या अन्यायकारक प्रथा बंद करण्यासाठी कायदा आणण्याची विनंती करतो असे आमदार युरी आलेमावयांनी आज विधानसभेत सांगितले.

पतीच्या निधनानंतर स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारी कृत्ये केली जातात. तिच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जाते. समाजात विधवेला आत्मविश्वासाने जगण्याची संधी देणं आवश्यक आहे. विधवा प्रथा बंद करणे हा एक धार्मिक मुद्दा असला तरी आपण महिलांच्या हक्कांबाबत जागरूक असणे आवश्यक आहे.

माझा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला असला तरी मी ख्रिश्चन आमदार नाही मी एक गोमंतकीय आहे. त्यामुळेच महिलांच्या हक्क आणि आत्मसन्मानाची वेळ येते तेव्हा सर्व धार्मिक नेते एकाच व्यासपीठावर असतील असे मी मानतो असे आलेमाव यांनी विधानसभेत बोलताना सांगितले.

Yuri Alemao
Goa Corona Update: गोव्यात पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना, आज शंभरहून अधिक रूग्ण, सक्रिय रूग्णसंख्येत मोठी वाढ

पुरातन प्रथा आणि मानसिकतेविरुद्ध सर्व महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा बोलावण्यासाठी पंचायत विभाग आणि गोवा राज्य महिला आयोग यांच्या समन्वयाने पावले उचलावीत असे यांनी यावेळी सांगितले.

तसेच पंचायत, महानगरपालिका प्रशासन आणि गोवा राज्य महिला संचालनालय आणि मानवाधिकार आयोग यांनी याबाबत पुढाकार घ्यावा असे त्यांनी यावेळी सांगितले.

Yuri Alemao
Vasco News: अमेरिकेचं 'व्हायकिंग नेपच्यून' 1285 पर्यटकांसह मुरगाव बंदरात दाखल

लग्नानंतर स्त्रियांना मिळणार मान पतीच्या निधनानंतर अचानक बदलला जातो. पतीच्या निधनानंतर स्त्रियांवर गंभीर परिस्थिती उभी राहते. त्यांच्या समोर ज्वलंत प्रश्न उभे राहतात. त्यामुळे विधवा प्रथा बंद कायदा लवकरात लवकर टायर करावा असे मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.

तर या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की या विषयावर सखोल विचार होणे आवश्यक आहे. कायदेतज्ज्ञांची मदत घेऊन यावर ठोस निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com