Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: बसचालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला; वृध्द जोडपे थोडक्यात बचावले; साखळी-होंडा मार्गावरील घटना!

Goa Accident News: साखळी ते होंडा या मार्गावरील खालचे हरवळे येथील जंक्शनवर बस व दुचाकीत झालेल्या अपघातात स्कूटरवरील वृध्द जोडपे सुदैवाने बचावले.

Manish Jadhav

साखळी ते होंडा या मार्गावरील खालचे हरवळे येथील जंक्शनवर बस व दुचाकीत झालेल्या अपघातात स्कूटरवरील वृध्द जोडपे सुदैवाने बचावले. बसचालकाने प्रसंगावधान राखून बस बाजूला घेतल्याने मोठा अनर्थ टळला. संध्या. 6 वा. च्या सुमारास हा अपघात घडला.

दरम्यान, जीए 04 टी 6949 ही प्रवासी बस वाळपई येथून साखळीच्या दिशेने जात असता साखळी येथून खालचे हरवळे येथे जाणाऱ्या जीए 04 के 6145 या स्कूटरवरील वृध्दाने अचानक साईड लाइट मारत उजव्या बाजूने स्कूटर वळवली. बसचालकाने प्रसंगावधान राखत ब्रेक लावत बस रस्त्याच्या बाजूला मारून घेतली. तरीही स्कूटरची बसच्या पुढील चाकाला धडक बसली. त्यात स्कूटरवरील दोघेही रस्त्यावर पडले.

साखळी आरोग्य केंद्रात दाखल

मागे बसलेल्या महिलेच्या डोक्याला मार बसल्याने तिची शुद्ध हरपली तर वृद्धाला पायाला व हाताला किरकोळ मार बसला. लोकांनी महिलेला पाणी देऊन शुद्धीवर आणले. त्यानंतर 108 रुग्णवाहिकेतून दोघांनाही साखळी सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chit Celebration Ban: IPL मध्ये 'पर्ची सेलिब्रेशन'वरून मोठा राडा! माजी क्रिकेटपटू भडकला, थेट 'BCCI' कडे केली 'ही' मोठी मागणी

Viral video: विदेशी तरूणीनं पहिल्यांदाच खाल्लं भारतीय 'पान'; रिएक्शन पाहून नेटीझन्सना हसू आवरेना, व्हिडिओ व्हायरल!

NEET Paper Leak: आता उघडणार सर्व गुपितं! बॉटनी प्रोफेसर मनीषा मंधारेला 14 दिवसांची 'CBI' कोठडी; मथुरेतून झाली होती अटक

Goa Drowning Death: बुडून मृत्यू की घातपात? कुळे येथील दूधसागर नदीत मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू

Goa House Fire: मयते-अस्नोडा येथे भीषण आग; घराची स्टोअर रूम जळून खाक, 3 लाखांचे सामान भस्मसात

SCROLL FOR NEXT