Dixon Vaz | Venzi Viegas Dainik Gomantak
गोवा

Quelossim Panchayat: केळशीतील आशिष नेहराच्या अवैध रस्त्यावरुन सरपंच-आमदार यांच्यात खडाजंगी; एकमेकांना हमरी-तुमरी करत...

Ashish Nehra Illegal Road in Quelossim: प्रसिद्ध क्रिकेटर आशिष नेहरा यांच्या मालकीच्या जागेत जाण्यासाठी अवैधरित्या रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे केळशीत वातावरण तापले.

गोमन्तक डिजिटल टीम

Quelossim News: केळशी समुद्र किनाऱ्यावर जाणाऱ्या वाटेवर असलेली वाळूची टेकडी कापून प्रसिद्ध क्रिकेटर आशिष नेहरा यांच्या मालकीच्या जागेत जाण्यासाठी अवैधरित्या रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे केळशीत वातावरण तापले असून याच मुद्द्यावरून केळशीचे सरपंच डिक्सन वाझ आणि बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांच्यात हमरी तुमरी झाली.

एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा विद्ध्वंस होत असतानाही सरपंच गप्प का, असा सवाल आमदार व्हिएगस यांनी यावेळी केला आणि ही जमीन पूर्वस्थितीत आणण्यासाठी काय प्रयत्न झाले, असा सवाल केला तर सरपंच डिक्सन वाझ यांनी हा रस्ता अवैध असल्याने काम बंदचा आदेश पंचायतीने जारी केला आहे.

मात्र, जमीन पूर्वस्थितीत आणण्याचे आदेश काढण्याचे काम सीआरझेडचे आहे, असे त्यांनी सांगितले. असे असले तरी पंचायत हाही आदेश जारी करेल, असे त्यांनी सांगितले. गोलंदाज आशिष नेहरा याने दक्षिण गोव्यात केळशी समुद्र किनाऱ्याजवळ एक जमीन घेतली असून या मालमत्तेत जाण्यासाठी वाट नसल्याने ही वाट बनवली जात होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT