Amthane Dam Water Level Dainik Gomantak
गोवा

Amthane Dam: ‘आमठाणे’तील पाणी घटले! जलसाठा 9 मीटरनी कमी; आता भिस्त साळ बंधाऱ्यावर

Amthane Dam Level: उत्तर गोव्याची तहान भागवणाऱ्या आमठाणे धरणातील जलसाठा कमालीचा घटला असून, सभोवतालचे पात्र कोरडे पडले आहे.

Sameer Panditrao

Amthane Dam Water Level

डिचोली: उत्तर गोव्याची तहान भागवणाऱ्या आमठाणे धरणातील जलसाठा कमालीचा घटला असून, सभोवतालचे पात्र कोरडे पडले आहे. आज मंगळवारी दुपारपर्यंत या धरणातील जलसाठा क्षमतेपेक्षा जवळपास ९ मीटरनी कमी झाल्याचे दिसून आले.

ऐन मार्च महिन्यात जलसाठा कमी झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी आता साळ बंधाऱ्यातील पाण्यावर भिस्त अवलंबून आहे.

दरम्यान, महिन्यापूर्वी तिळारी कालव्याला भगदाड पडल्यानंतर गोव्याचा पाणीपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे आमठाणे धरणावर ताण आला होता.

या समस्येवर मात करण्यासाठी या धरणातून नियमितपणे अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती.

मेणकुरे-धुमासे पंचायत क्षेत्रात येणाऱ्या आमठाणे धरणाचे कार्यक्षेत्र ५८२ हेक्टर मीटर एवढे आहे. तर, पाण्याची पातळी ५२ मीटर एवढी आहे. गेल्या आठवड्यापर्यंत या धरणातील जलसाठ्याची पातळी जवळपास ७ मीटरनी घटली होती. तरीसुद्धा जनतेने काळजी करू नये असे आवाहन करण्‍यात आले आहे.

लोकांनी काळजी न करण्‍याचे आवाहन

आज सायंकाळपर्यंत या धरणातील जलसाठा ४३ मीटर एवढा खाली आला. धरणाच्या सभोवतालचे पात्र कोरडे पडले आहे. अलीकडच्या तीन ते चार वर्षांत ऐन मार्च महिन्यात धरण सभोवतालचे पात्र कोरडे पडले नव्हते. या धरणात साळ बंधाऱ्यातून अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्यानंतर हळूहळू जलसाठा नियंत्रित करण्‍यात येणार आहे. पावसाळ्यापर्यंत पाणी नियंत्रित ठेवण्यात येणार असल्याने जनतेने काळजी करू नये, असे जलस्रोत खात्याने स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारताने रचला नवा इतिहास! संरक्षण उत्पादनाने गाठला 1.78 लाख कोटींचा सर्वकालिक उच्चांक; स्वदेशी लष्करी ताकदीचा जागतिक डंका

NCERT Dancing Girl Controversy: इतिहासाशी छेडछाड! 4500 वर्षांपूर्वीच्या 'डान्सिंग गर्ल' मूर्तीला कपडे घालण्याचा एनसीईआरटीचा अजब पराक्रम; पुरातत्त्वशास्त्राची ऐशीतैशी

Trigrahi Yog 2026: नशिबाची साथ आणि धनलाभाचा योग! गुरु-चंद्र-शुक्र युतीमुळे 7 राशींचे भाग्य उजळणार; 'त्रिग्रही योग' ठरणार वरदान

Goa Politics: '31 जुलैपर्यंत मागण्या मान्य करा, नाहीतर... ' वाढीव वीजबिलांवरुन केजरीवाल आक्रमक; गोवा सरकारला दिला अल्टिमेटम

खरी कुजबुज: ना घरका, ना घाटका!

SCROLL FOR NEXT