Amthane Dam Dainik Gomantak
गोवा

Amthane Dam: 'नो एंट्री'चा फलक, तरीही वाहतूक सुरूच! ‘आमठाणे’ धरणावरून गाड्यांची ये-जा

Amthane Dam No Entry: आमठाणे धरणावर नव्याने ‘गेट’ बसवण्यात येत असून, तिचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. ‘गेट’च्या कामामुळे तूर्त ‘आमठाण’वरुन वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.

Sameer Panditrao

डिचोली: आमठाणे धरणावरुन सध्या वाहतुकीस बंदी असली, तरी जबरदस्तीने वाहतूक करण्याचे प्रकार घडत आहेत. वाहतुकीवरुन गोंधळ उडत असतानाच, बऱ्याचदा वादावादीही होत आहे, अशी माहिती मिळाली आहे.

आमठाणे धरणावर नव्याने ‘गेट’ बसवण्यात येत असून, तिचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. ‘गेट’च्या कामामुळे तूर्त ‘आमठाण’वरुन वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. आमठाणे धरणावरील रस्त्यावरुन केवळ दुचाकीसह कार न्यायला मिळतात. मात्र सध्या या वाहनांनाही बंदी घालण्यात आली आहे.

वाहतूक बंदीविषयी आगाऊ कल्पना देणारे सूचना फलक धरणाच्या दोन्ही बाजूने लावण्यात आलेले आहेत. तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष करून धरणावरुन वाहतुकीचे प्रकार चालूच असल्याचे दिसून येत आहे. काहीजण तर जबरदस्तीने धरणावरील रस्त्यावरुन वाहतूक करतात. बऱ्याचदा वादविवादही होतात.

दोन्ही बाजूने वाहने अडकल्याने कोंडी

७ दिवसांपूर्वी म्हणजेच गेल्या सोमवारी (ता. १४) धरणावरील रस्त्यावरुन एकाचवेळी दोन्हीबाजूने मोटारगाड्या आल्याने त्या जवळपास अर्धा तास धरणावर अडकून पडल्या होत्या. गाडी मागे कोणी घ्यायची, या मुद्यावरून वादही झाला, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, धरणावरील ‘गेट’चे काम युद्धपातळीवर सुरू असून, चालू महिन्याच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT