Amona Sanquelim Accident Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Accident: आमोणा, साखळी येथील भीषण अपघातात दोन्ही चालक जखमी; दोन्ही कारचा चकणाचूर

Amona Sanquelim: दोन्ही चालकांना बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

साखळी: आमोणा, साखळी येथील पुलाजवळ दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले. त्यांना बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तर दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दुपारी दीडच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. न्हावेली येथील संजय रामचंद्र गावस हा जीए ०४ एच १०८१ हे एका कारने न्हावेलीच्या दिशेने येत होते. तर अडोल्फ लेरी गोम्स हा जीए ०४ टी ७५४० या टाटा झेस्ट कारने आमोणेहून माशेलच्या दिशेने जात असताना दोन्ही कारमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली.

या धडकेत दोन्ही कार रस्त्याच्या बाहेर फेकल्या गेल्या व काठावर स्थिरावल्या. किया कार तर रस्त्याच्या बाजूला एका झाडाला लागून अडकली. अन्यथा बाजूच्या शेतात पडली असती. लोकांनी कारमध्ये अडकलेल्या चालकांना बाहेर येण्यासाठी मदत केली. १०८ रूग्णवाहिकेतून दोन्ही चालकांना साखळीतील सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून दोन्ही चालकांना गोमेकॉत नेण्यात आले. साखळी पोलीस आऊट पोस्टचे हवालदार प्रवीण शेट्ये यांनी पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT