Goa Accident death  Dainik Gomantak
गोवा

Amona Accident: बस गेली 'रिव्हर्स गियर'मध्ये, पायावरून गेले चाक; आमोणेतील अपंगत्व आलेल्या व्यक्तीला 24 लाख भरपाई देण्याचा आदेश

Amona Bus Accident Compensation: व्यवसायाने मासळी विक्रेते असलेले विनय सावंत हे सदर प्रवासी बसमधून माशेल ते आमोणा दरम्यान प्रवास करत होते.

Sameer Panditrao

म्हापसा: आमोणा येथे एका बस अपघातात जखमी होऊन अपंगत्व आलेल्या विनय उर्फ विनायक भिकाजी सावंत (रा. आमोणा डिचोली) यांना ‘नो-फॉल्ट-दायित्व’ रक्कमेसह २४. ४६ लाख रुपये भरपाई रक्कम देण्याचा आदेश म्हापसा मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने (लवाद) बस चालक तथा मालक आणि विमा कंपनीला दिला.

या भरपाई दावा खटल्यात बस चालक तथा मालक व एका खासगी विमा कंपनीला प्रतिवादी बनवले होते.हा अपघात ३१ जुलै २०१३ रोजी, रात्री सावंतवाडा आमोणा येथील बस थांबाजवळ घडला होता. व्यवसायाने मासळी विक्रेते असलेले विनय सावंत हे सदर प्रवासी बसमधून माशेल ते आमोणा दरम्यान प्रवास करत होते.

घटनेच्यावेळी बस थांबाजवळ बस प्रतिवादी बस चालकाने उभी केली. त्याबरोबर दावेदाराने बसचा दरवाजा उघडला असता, बस चालकाने अचानक बस गाडी रिव्हर्समध्ये नेली. त्याबरोबर उघड्या दरवाज्यातून दावेदार खाली कोसळलेल्या व त्यांच्या पायावरून बसचे चाक गेले.

या बस खाली चिरडून दुखापत झालेल्या पायांवर गोमेकॉत शस्त्रक्रिया करण्यात आली.घटनेच्यावेळी दावेदार हे ४४ वर्षांचे होते व मासेविक्रीतून ते मासिक १५ हजार रुपये उत्पन्न मिळवायचे. या अपघातामुळे अपंगत्व आल्यामुळे आपणास नुकसान भरपाई मिळावी, म्हणून दावेदार सावंत यांनी मार्च २०१७मध्ये न्यायप्राधिकरणाकडे दावा याचिका दाखल केली.

६ टक्के व्याजासह भरपाई!

मार्च २०१७ पासून ६ टक्के वार्षिक व्याजासह २२ लाख ४६ हजार ५६० रुपये रक्कम नुकसान भरपाई दाव्याच्या स्वरूपात देण्याचा आदेश लवादाच्या पीठासीन अधिकारी यांनी दिला. प्रतिवादी विमा कंपनीने सदर रक्कम व्याजासह मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाच्या म्हापसा स्टेट बँकेच्या चालू बँक खात्यात जमा करावी व न्यायाधिकरण तसेच दावेदाराला याची माहिती द्यावी, असे निर्देशही या निवाड्यात लवादाने दिलेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 13 September 2026: बुध-चंद्राचा महासंग्राम! आज 'या' 3 राशींवर ओढवणार मोठे संकट? पैशांचे व्यवहार करताना सावध राहा

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

SCROLL FOR NEXT