चिखली : मुंबई - गोवा महामार्गालगत असलेल्या चिखली येथे काल रात्री कोल्ड स्टोरेज व आईस फॅक्टीरीमध्ये सिलिंडरमधून अमोनिया गॅसची गळती झाली. रात्री उशीरा ही गळती झाल्याने चिखली गावात भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती ताबडतोब अग्निशमन दलाला तसेच पोलिसांना देण्यात आली. या गॅस गळती माहिती चिखली गावातील ग्रामस्थांना रात्रीच देऊन सतर्क करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन ही गळती बंद केली. ही गॅस गळती कशामुळे झाली याचा तपास सध्या सुरू आहे.
अधिक वाचा :
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.