Ammonia gas leakage in M.P.T at Berth No.8 Dainik Gomantak
गोवा

वास्को MPT बर्थ क्रमांक आठ येथे अमोनिया वायूची गळती, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

वायू गळतीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.

Pramod Yadav

Ammonia gas leakage in M.P.T at Berth No.8: वास्को येथील मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या बर्थ क्रमांक आठवर अमोनिया वायूची गळती झाली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. गळती कमी प्रमाणात असल्याने अग्निशमन दलाचे जवान दाखल होण्यापूर्वी पोर्टवरील कर्मचाऱ्यांनी वायू गळतीवर नियंत्रण मिळवले.

बर्थ क्रमांक आठमध्ये अमोनिया वायू गळती झाल्याची माहिती मिळाताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान दाखल होण्यापूर्वी येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वायू गळतीवर नियंत्रण मिळवले होते. कमी प्रमाणातील गळती असल्याने त्यावर तात्काळ नियंत्रण मिळवता आले असे सांगण्यात आले.

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर घटनास्थळी दाखल झाले. MPT येथील अमोनियाच्या टाकी टाईमबॉम्ब आहेत. याबाबत वारंवार हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आल्याचे आमदार आमोणकर म्हणाले.

आज सकाळी ही घटना पण, सुदैवाने त्यावर नियंत्रण मिळवता आले. पण भविष्यात मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? हा टाईमबॉम्ब आम्हाला या मतदारसंघात नको, त्याला दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट करा अशी मागणी आमदार आमोणकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT