Amit Patkar News | Goa Congress News Dainik Gomantak
गोवा

राजीनामा द्या, मगच पक्षांतर करा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पाटकर यांचे फुटीर आमदारांना आव्हान

दैनिक गोमन्तक

पणजी : काँग्रेसचे आमदार फुटून भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या अफवा रोज येत असून येणाऱ्या काळात पक्षांतर होणार असल्याची चर्चा सध्या राज्‍यात सुरू आहे, परंतु पक्षांतराचा एक प्रयत्न विफल केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे शांत बसलेले नसून आपण कुठल्याही परिस्थितीत पक्षांतर व्हायला देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिंमत असेल, तर राजीनामा द्या आणि पक्षांतर करा, असे जाहीर आव्हान पाटकर यांनी फुटीर आमदारांना दिले आहे.

पक्षांतर करण्याच्या अफवा सुरूच असून मंगळवारी रात्री उशीरा पक्षाचे आमदार विधानसभेत पोहोचल्याची अफवा पसरल्याने खळबळ उडाली होती. त्यात सभापती रमेश तवडकर आणि काँग्रेसच्या आमदारांचे फोन लागत नसल्याने एक खळबळ उडाली होती. आज पक्षांतर होणार अशी अफवा पसरली होती. ज्यांना पक्ष सोडून जायचे असेल, त्यांनी खुशीने जावे, परंतु त्यासाठी आमदारकीचा राजीनामा देऊन लोकांच्या समोर जावे. त्यांच्यात ही हिंमत नाही. कारण लोकांनी त्यांना काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आणले आहे. असे केल्‍यास त्यांचा पराभव निश्‍चित असल्याचे पाटकर म्हणाले.

विधिमंडळ गटनेता येत्या आठवड्यात?

काँग्रेस विधिमंडळ गटनेतेपदावरून मायकल लोबो यांची हकालपट्टी होऊन जवळपास तीन आठवडे पूर्ण व्हायला आले असले, तरी पक्षाचा नवीन नेता ठरत नाही. यासंदर्भात दिल्लीत पाटकर यांची केंद्रीय नेत्यांसबोत बैठक झाली होती. या आठवड्यात आणखी एक बैठक होणार होती, परंतु पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू असल्याने अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून निषेध प्रदर्शन सुरू आहे. त्यामुळे केंद्रीय नेते यात व्यस्त असल्याने विधिमंडळ गटनेता ठरण्यासाठी विलंब होत असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली. पुढच्या आठवड्यात विधिमंडळ गटनेता निवडण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT