Goa Congress allegations Dainik Gomantak
गोवा

Goa Congress Protest: 28 मतदार एकाच खोलीत? निवडणूक अधिकाऱ्यांची अचानक नेमणूक; काँग्रेसचा मोठा आरोप

Amit Patkar Goa Congress: काँग्रेस पक्षाने मतदार यादीत अनेक अनियमितता असल्याचा दावा करत, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला

Akshata Chhatre

पणजी: गोव्याच्या राजकारणात सध्या मतदार यादीतील गोंधळावरून मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेस पक्षाने मतदार यादीत अनेक अनियमितता असल्याचा दावा करत, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

घराचा क्रमांक ‘शून्य’ पण मतदार नोंदणी?

सांगे मतदारसंघातील भाग १४ मध्ये अनेक मतदारांची नोंदणी घर क्रमांक ‘०’ वर केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. प्रत्यक्षात ‘शून्य’ क्रमांक असलेले घर असणे अशक्य असताना, अशा प्रकारे मतदारांची नोंदणी कशी झाली, यावर काँग्रेसने बोट ठेवले आहे. हा प्रकार गंभीर असून, यामागे मोठा 'घोळ' असल्याचा संशय व्यक्त केला जातोय

२८ मतदार एकाच खोलीत?

वेळ्ळी मतदारसंघातील भाग ४ मध्ये एक लहानशी खोली असून, तिथे फक्त दोन व्यक्ती राहतात. मात्र, या एकाच पत्त्यावर तब्बल २८ मतदारांची नोंदणी केल्याचे काँग्रेसने निदर्शनास आणले आहे. हा प्रकार बनावट मतदारांची संख्या वाढवण्यासाठी केला असावा, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

ज्या घरात कुणीच नाही, तिथेही मतदार?

सांताक्रुझ मतदारसंघातील भाग २३ मध्ये, अनुक्रमांक ३१६ ते ३४३ पर्यंत २८ बनावट मतदार नोंदवल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ज्या पत्त्यावर हे मतदार नोंदवले आहेत, तिथे प्रत्यक्षात कुणीही राहत नाही. मूळ रहिवाशांनाही या मतदारांबद्दल काहीही माहिती नाही.

निवडणूक अधिकारी नियुक्तीवरही प्रश्नचिन्ह

या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी काँग्रेसचे नेते मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे जात असताना, त्यांना पोलिसांनी अडवले. गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या दोन महिन्यांपासून गोव्याला पूर्णवेळ मुख्य निवडणूक अधिकारी नव्हते. अचानक, काल रात्री संजय गोयल यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली, यामागे नेमके काय कारण आहे, असा प्रश्नही पाटकर यांनी उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT