Curchorem Waste Issue Meeting|Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Curchorem News: सरकारचा ‘कचरा तुमच्या दारी’ उपक्रम सुरु; कुडचडे कचरा समस्येवरुन अमित पाटकर यांचा टोला

गोमन्तक डिजिटल टीम

Curchorem Garbage Dispute

पणजी: कुडचडे येथे खासगी मालमत्तेत बेकायदेशीरपणे टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या समस्येविषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी कचरा व्यवस्थापनमंत्री बाबूश मोन्सेरात यांना निवेदन सादर केले. तसेच बुधवारपर्यंत या समस्येवर तोडगा न काढल्यास स्थानिक आमदाराच्या दारात कचरा टाकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली कुडचडे येथील जनतेच्या शिष्टमंडळाने कचरा व्यवस्थापन मंत्र्यांना निवेदन सादर केले. त्यानंतर मंत्रालयाबाहेर माहिती देताना पाटकर म्हणाले, भाजप सरकारने राज्यात काही महिन्यांपूर्वी ‘सरकार आमच्या दारी’ हा उपक्रम राबवला, पण हे सरकार सपशेल अपयशी ठरले असून आता ‘कचरा तुमच्या दारी’ असा उपक्रम राबवत आहे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

नगरपालिका कुडचडेतील नागरिकांकडून कचरा संकलनाचा कर आकारते. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आम्ही नगरविकास मंत्र्यांकडे या समस्या मांडण्यासाठी आलो होतो, पण ते भेटू शकले नाहीत, असे सांगत पाटकर म्हणाले, तेथील कचऱ्याचा घाण वास येतो, त्याशिवाय तेथे डासांचीही उत्पत्ती होत आहे. तेथील आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांना ही समस्या दिसत नाही. नगरपालिकाही या कचऱ्याविषयी काहीच पावले उचलत नाही.

नगरविकासमंत्री नसल्याने आम्ही कचरा व्यवस्थापन मंत्र्यांना निवेदन दिले असून बुधवारपर्यंत तेथील कचरा उचलला नाही, तर तो कचरा आमदाराच्या दारात नेऊन टाकला जाईल. कायदा-सुव्यस्थेचा प्रश्‍न उपस्थित झाल्यास त्यास सरकार जबाबदार राहील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

‘कचऱ्याच्या विल्हेवाटीत सरकारला अपयश’

राज्यभर कचऱ्याची समस्या आहे, हे सरकार कचरा गोळा करण्यात आणि विल्हेवाट लावण्यात अपयशी ठरले आहे. कुडचडे येथे कचरा आणला जातो, तेथे कचरा विकेंद्रीकरण केले जाते, तेथून तो कचरा एक किलोमीटरवर असलेल्या प्रकल्पात नेला जातो. त्या ठिकाणापासून १०० मीटर अंतरावर आमदार राहतात, असे अमित पाटकर यांनी सांगितले.

बाबूश मोन्सेरात यांनी मागविला अहवाल

जर तेथील कचऱ्याचा सर्वांना त्रास होत असेल, तर त्याविषयी कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना आपण अहवाल देण्यास सांगितले आहे. कारण तो परिसर स्वच्छ असल्याची छायाचित्रे दाखविली आहेत, परंतु अमित पाटकर यांनी तो परिसर स्वच्छ झाला, पण संध्याकाळी पुन्हा तो परिसर कचऱ्याने व्यापल्याचे सांगितले असल्याने आपण त्याची दखल घेतली आहे, असे कचरा व्यवस्थापनमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात हाय व्होल्टेज ड्रामा, वर्षा उसगांवकर - पॅडी कांबळे यांच्यात वाद Video

दक्षिण गोव्यात Swiggyचे डिलिव्हरी बॉय आक्रमक; कंपनीला राज्यातून हद्दपार करण्याची मागणी

Goa Today's News Live: गोवा आघाडीत बिघाडी? पाटकरांच्या 'त्या' विधानाला काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरेंचाही पाठींबा!

ISL 2024-25: आजच्या सामन्यात एफसी गोवाला ऐतिहासिक विक्रमाची संधी! ठरणार पहिलाच संघ

Cutbona Jetty: 'ते' अजूनही 'कुटबण' स्वच्छतेत सामील होऊ शकतात! मंत्री सिक्वेरांचे आमदार सिल्वांना आवाहन

SCROLL FOR NEXT