Amit Patkar  Dainik Gomantak
गोवा

Amit Patkar: ''...हा तर देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान''; मोहन भागवतांच्या वक्तव्याचा पाटकरांकडून निषेध

Amit Patkar Condemns Mohan Bhagwat Statement: गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या ‘भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही’ या विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या ‘भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही’ या विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. त्यांनी या विधानाला स्वातंत्र्यसंग्रामातील असंख्य हुतात्म्यांच्या त्यागाचा अवमान व भारतीय राज्यघटनेवर थेट हल्ला म्हटले आहे.

पाटकर यांनी भाजप (BJP) आणि त्यांच्या शाखेतून प्रशिक्षित मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर लोकांचे लक्ष भागवत यांच्या देशविरोधी वक्तव्यावरून दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. त्यांनी सावंत यांच्यावर राष्ट्रीय अभिमानापेक्षा राजकीय निष्ठेला प्राधान्य दिल्याचा आरोप करत, यामुळे जनतेचा विश्वास अधिकच कमी झाला आहे, असे म्हटले आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेस पक्ष नेहमीच न्याय, समानता आणि राज्यघटनेच्या मूल्यांसाठी उभे राहिले आहेत. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांच्या बलिदानाचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असे पाटकर म्हणाले. काँग्रेस पक्ष भागवत आणि भाजपने त्यांच्या या धक्कादायक विधानावर खुलासा करावा, अशी मागणी करतो. तसेच, देशातील जनतेला अशा देशविरोधी प्रवृत्तींविरोधात जागृत राहण्याचे आवाहन करतो, असे पाटकर यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: 29 जुलैपर्यंत गोव्यात पावसाचा यलो अलर्ट

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT