presidency of the Pradesh Congress Committee dainik gomantak
गोवा

कोण होणार? प्रदेश काँग्रेस समितीचा अध्यक्ष? अमित पाटकर अन् कार्लोस फेरेरा शर्यतीत

नवीन चेहरा अध्यक्षपदी आणून पक्षात चैतन्य आणण्याचा प्रयत्न

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोव्यात काँग्रेसची जागा आरजी पक्ष घेऊ पाहत असताना काँग्रेसच्या अध्यक्षपदी नवीन चेहरा आणून तरुणांना पक्षाकडे ओढण्याचे काँग्रेस ठरवले असून त्यासाठी अमित पाटकर किंवा कार्लोस फेरेरा यांच्याकडे प्रदेश अध्यक्षपदाची सूत्रे देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Amit Patkar and Carlos Ferreira in the race for the presidency of the Pradesh Congress Committee)

गोव्यात (Goa) आलेल्या केंद्रीय निरीक्षक रजनी पाटील यांच्याशी काल मडगावात (Madgaon) झालेल्या चर्चेत हा प्रस्ताव पुढे आल्याचे कळते. संकल्प आमोणकर आणि कॅ. विरियातो फेर्नांडिस ही या शर्यतीत असलेली अन्य दोन नावे आहेत.

काल पाटील यांच्या बरोबर झालेल्या चर्चेत कॅ. फेर्नांडिस यांनी आपल्याला अध्यक्ष बनविण्या ऐवजी युवा नेते पाटकर यांच्याकडे ही सूत्रे घ्यावीत तसेच कार्लोस फेरेरा यांच्यावरही महत्वाची जबाबदारी द्यावी अशी मागणी केली. आपण स्वतः काँग्रेस समितीच्या कार्यात झोकून देऊन काम करण्याची तयारी कॅ. फेर्नांडिस यांनी यावेळी दाखवली.

दरम्यान काल रजनी पाटील यांच्यासमोर काँग्रेस मधील बेदिलीही उघड झाली. वेळ्ळी येथील काँग्रेस उमेदवार सावियो डिसिल्वा यांच्या समर्थकांनी पक्षातील जबाबदार प्रतिनिधींनी विरोधी काम केल्यामुळेच वेळ्ळीत काँग्रेसचा पराभव झाला असे आरोप करून काँग्रेसचे (Congress) दक्षिण गोवा अध्यक्ष ज्यो डायस याना यावेळी लक्ष्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT