Amit Palekar  Dainik Gomantak
गोवा

Suleman Khan Case: 'तेच ते प्रश्‍न, तिच ती उत्तरं; सरकार की पोलिस माझ्या प्रेमात पडलंय कळत नाही' - पालेकर

Goa AAP Leader Amit Palekar: सुलेमान खान याच्या पलायनप्रकरणी `आप’चे समन्वयक ॲड. अमित पालेकर यांना जुने गोवे पोलिसांनी तिसऱ्यांदा समन्स पाठवून आज तासभर चौकशी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: जमीन हडप प्रकरणातील मास्टरमाईंड संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याच्या पलायनप्रकरणी `आप’चे समन्वयक ॲड. अमित पालेकर यांना जुने गोवे पोलिसांनी तिसऱ्यांदा समन्स पाठवून बुधवारी (०८ जानेवारी) तासभर चौकशी केली.

यापूर्वी केलेल्या चौकशीवेळी विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांची पुन्हा उजळणी पोलिसांनी केली. संशयित सुलेमान याने पलायनानंतर पाठविलेल्या पहिल्या व्हिडिओसंदर्भात प्रश्‍न विचारण्यात आले, मात्र दुसऱ्या व्हिडिओत त्यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भात कोणतेही प्रश्‍न विचारण्यात आले नाही. तेच प्रश्‍न व तिच तिच उत्तरे अशा प्रकारे पोलिसांनी जबानी नोंद केली.

पोलिसांना जबानी दिल्यानंतर माहिती देताना ॲड. अमित पालेकर (Amit Palekar) यांनी सांगितले की, या चौकशीत नव्याने काही नव्हते. आम आदमी पक्षाचा अध्यक्ष असल्याने सरकारविरोधात आरोप करतो त्यामुळे वारंवार बोलावून हा सतावणुकीचा प्रकार आहे.

मी या प्रकरणात आरोपी नसून साक्षीदार आहे. जो संशयित आहे तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे जुने गोवे पोलिस कोणतीही कारवाई करू शकत नाही. सरकार की पोलिस माझ्या प्रेमात पडले आहे, हे कळत नाही, म्हणून मला वारंवार बोलावत आहेत. तेच तेच प्रश्‍न व तिच तिच उत्तरे ते घेत आहेत, असे पालेकर यांनी सांगितले.

माझी सतावणूक!

संशयित सुलेमान याची चौकशी कऱण्यासाठी न्यायालयाने (Court) सात दिवसांची कोठडी दिली होती, त्यातून त्यांनी चौकशी केली असेल. त्यामुळे माझ्या चौकशीतून त्यांना नवे काही मिळणार नाही. त्याची कोठडी आणखी वाढवून घेतली नाही, त्यामुळे मला बोलावून चौकशी करणे, ही माझी सतावणूक आहे, असेही पालेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkani Drama Competition: साखळीत आजपासून 'कोकणी नाट्य' स्पर्धा, मुख्यमंत्र्यांच्‍या हस्‍ते उद्‌घाटन; सत्तरी, डिचोलीतील 18 मंडळांचा सहभाग

Camurlim Illegal Construction: 'ते' बांधकाम बेकायदाच! हायकोर्टाचे शिक्कामोर्तब; कामुर्लीतील बांधकाम पाडण्याचे आदेश

Goa Mining: आता डंप हाताळणी 'सावधानतेने'! डीपीआर आवश्यक; कोट्यवधींची बँक हमीही द्यावी लागणार

Goa Police: तीन पोलिस निलंबित, तर दोघांवर शिस्तभंग; गोळीबार, एडबर्ग मारहाण प्रकरणी कारवाई

सीमा, स्विटी, सरस्वती, रश्मी.... ब्राझीलमधील मॉडेलचा फोटो वापरून 10 बूथवर 22 वेळा मतदान; राहुल गांधी यांचा नवा खुलासा

SCROLL FOR NEXT