Amit Palekar Goa Police allegation Dainik Gomantak
गोवा

Section 39-A protest: 'गोवा पोलिस' आता राजकीय पक्ष बनलाय, कलम '39-अ' आंदोलनावरून अमित पालेकरांचा गंभीर आरोप

Amit Palekar Goa Police allegation: गोवा पोलिस हा आता एक ‘राजकीय पक्ष’ झाला आहे, असा गंभीर आरोप ॲड. अमित पालेकर यांनी केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोवा पोलिस सध्या ज्या प्रकारे वागत आहेत, समन्स बजावत आहेत आणि इतर कारवाया करत आहेत, ते पाहता गोवा पोलिस हा आता एक ‘राजकीय पक्ष’ झाला आहे, असा गंभीर आरोप ॲड. अमित पालेकर यांनी केला आहे. पणजी येथे गेल्या आठवड्यात झालेल्या कलम ‘३९-अ’ विरोधी आंदोलनाप्रकरणी पणजी पोलिसांनी विविध आंदोलक आणि राजकीय नेत्यांना समन्स बजावले आहे

या पार्श्वभूमीवर पालेकर यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ॲड. अमित पालेकर यांनी दावा केला की, दोनापावल येथील ‘३९-अ’ विरोधी आंदोलनादरम्यान जी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे त्याला केवळ पोलिसच जबाबदार आहे.

राज्य सरकारने स्वतःहून बेकायदेशीर जमावाचा गुन्हा दाखल केला असून, हा गुन्हा मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून दाखल करण्यात आला आहे, असा आरोप पालेकर यांनी केला आहे. लोकांना याचा त्रास झाला असता तर कुणीतरी तक्रार दाखल केली असती परंतु तसे काहीच झाले नाही.

याच प्रकरणात आरजी पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी पोलिसांच्या कारवाईवर जोरदार टीका केली. पणजी पोलिस ठाण्यात हजर राहिल्यानंतर परब म्हणाले की, हे गुन्हे केवळ छळ करण्यासाठी दाखल केले आहेत. हे गुन्हे न्यायालयात टिकणार देखील नाहीत. परब यांनी आरोप केला की, ३९-अ अंतर्गत जमिनींचे रूपांतर होण्याच्या यादीत जुने गोवा प्रथम क्रमांकावर आहे, तर थिवी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT