Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

गोवा महिलांसाठी असुरक्षित, योगा केंद्र, आश्रमांना भेट देताना काळजी घ्या; UK सरकारची पर्यटकांना सूचना

Goa Tourism: कॅनडाने देशातील पर्यटकांना ज्‍या मार्गदर्शक सूचना जारी केल्‍या आहेत त्‍यात गोवा, दिल्ली हे महिलांसाठी सुरक्षित ठिकाण नाही असे नमूद केले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tourism

मडगाव: येत्‍या ऑक्‍टोबर महिन्‍यापासून गोव्‍यातील पर्यटन हंगाम सुरू होत असतानाच कॅनडा सरकारने आपल्‍या देशातील पर्यटकांना ज्‍या मार्गदर्शक सूचना जारी केल्‍या आहेत, त्‍यात गोवा हे महिलांसाठी सुरक्षित ठिकाण नाही, असे नमूद केल्‍याने गोव्‍यातील पर्यटन व्‍यावसायिकांत काहीसे चिंतेचे वातावरण पसरले आहे.

यापूर्वी दिल्‍ली आणि गोव्‍यात महिला पर्यटकांवर झालेले अत्‍याचार आणि बलात्‍काराच्‍या घटना पाहता या दोन्‍ही ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्‍था महिला पर्यटकांसाठी सुरक्षित नाही. याशिवाय योगा केंद्रे आणि आश्रम या ठिकाणीही भेट देताना आवश्‍‍यक ती खबरदारी घ्यावी, असे या सूचनेत म्‍हटले आहे.

गोव्‍यात यापूर्वी याेग प्रशिक्षकांकडून विदेशी महिला पर्यटकांवर लैंगिक अत्‍याचार झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर या मार्गदर्शक सूचना जारी केल्‍या आहेत.

सध्‍या कुटबण जेटीवर कॉलराचा उद्रेक झाला असून तोही येत्या पर्यटक हंगामाला मारक ठरू शकतो, असे सांगितले जाते. याचे कारण म्‍हणजे, ‘यूके’च्‍या (UK) पर्यटकांमध्‍ये याची धास्‍ती निर्माण झाली असून ‘यूके’मधील वेगवेगळ्‍या ऑनलाईन पर्यटन प्‍लॅटफॉर्मवर याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. पर्यटकांनी गाेव्‍यात जाताना आवश्‍‍यक ते खबरदारीचे उपाय घ्‍यावेत, असे या चर्चेद्वारे सुचविण्‍यात आले आहे.

आतापर्यंत कुटबण येथे कॉलराचे १८७ रुग्‍ण सापडले असून मोबोर येथे पाच मच्‍छीमार कामगारांना कॉलरामुळे मृत्‍यू झाला होता. मोबोर हे ब्रिटीश पर्यटकांचे गोव्‍यातील आवडते पर्यटन स्‍थळ असून त्‍यामुळेच या पर्यटकांमध्‍ये ही चिंतेची बाब आहे, अशी माहिती गाेव्‍यातील काही पर्यटन व्‍यावसायिकांनी दिली.

दिल्लीप्रमाणेच गोव्यातही स्थिती

१३ सप्‍टेंबर रोजी कॅनडा सरकारने या मार्गदर्शक सूचना जारी केल्‍या आहेत. त्‍यात भारताची राजधानी दिल्‍ली येथे होणारे महिलांवरील अत्‍याचार नमूद केले असून दिल्‍ली हे शहर महिलांसाठी असुरक्षित आहे, असे नमूद करताना गोव्‍यातही काही प्रमाणात तशीच स्‍थिती असल्‍याचे म्‍हटले आहे.

महिलांवर वाचिक अत्‍याचाराबरोबरच विनयभंग आणि अन्‍य अत्‍याचार होत असल्‍याचे नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT