Goa Congress Leader Amit patakar And finance minister Nirmala Sitharaman  Dainik Gomantak
गोवा

विरोधानंतरही गोवा सनबर्नसाठी तिकीट विक्री, काँग्रेसने थेट निर्मला सीतारामन यांच्याकडे मागितले स्पष्टीकरण

Goa Sunburn: सरकार स्वेच्छा दखल घेऊन कारवाई का करू शकत नाही? असा सवाल अमित पाटकर यांनी केला.

Pramod Yadav

पणजी: दक्षिण गोव्यात होणाऱ्या सनबर्नसाठी राज्यातून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. असे असताना सनबर्न आयोजकांनी त्यांच्या नोंदणीकृत सदस्यांसाठी तिकीट विक्रीची घोषणा केलीय. (Ticket Booking For Sunburn, Goa) तिकीटांच्या विक्रीवरील जीएसटीवरुन काँग्रेस नेते अमित पाटकरांनी घटकावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सनबर्न फेस्टिव्हलच्या (Sunburn Festival) अधिकृत समाज माध्यमावर सिक्रेट प्री-सेल लिंक" च्या केलेल्या उल्लेखाची दखल घ्यावी. गोव्यात सनबर्न फेस्टिव्हलला कोणतीही परवानगी दिलेली नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्टपणे सांगितले असल्याने परवानगीशिवाय तिकिटांची विक्री कशी सुरू झाली? तिकिटावरील जीएसटी घटकाचे काय? तुम्ही कारवाई करणार की गप्प बसणार?, असा सवाल अमित पाटकर यांनी अर्थमंत्र्यांना केला आहे.

सदर तिकिटांच्या बेकायदेशीर विक्री विरोधात नागरिकांनी तक्रार नोंदवावी असे बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांचा मी निषेध करतो. सरकार स्वेच्छा दखल घेऊन कारवाई का करू शकत नाही? असा सवाल अमित पाटकर यांनी केला.

या सनबर्न फेस्टिव्हलमुळे सर्व कॅबिनेट मंत्री, भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मलई मिळत असल्याने भाजप सरकार हे सर्व होऊ देत आहे. हा महोत्सव त्यांच्यासाठी वार्षिक 'मनी मेकिंग इव्हेंट' बनला आहे, असा आरोप अमित पाटकर यांनी केला.

सनबर्नचे प्रवर्तक मोदी-शहा यांच्या क्रोनी क्लबचे सदस्य असल्यानेच भाजप सरकारचे सनबर्नला अभय आहे. दक्षिण गोव्यात सनबर्नला विरोध करणारे ठराव पारित केलेल्या गोव्यातील पंचायतींचे मी आभार मानतो. मी उत्तर गोव्यातील जनतेलाही या सनबर्न महोत्सवाला विरोध करण्याचे आवाहन करतो. आपल्या मुलांच्या भविष्याचे रक्षण करण्यासाठी आपण एकजुटीने उभे राहू या, असे अमित पाटकर म्हणाले.

मी अर्थमंत्र्यांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे. जर त्या कारवाई करण्यात अयशस्वी ठरल्या, तर हे निश्चित होईल की डबल इंजिन सरकार या घोटाळ्याचा भाग आहे, असे अमित पाटकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लिव्ह-इन, लग्न अन् मग मृत्यूचा थरार! नवऱ्यानं घेतला गळफास, बायकोनं 17व्या मजल्यावरुन मारली उडी; बंगळुरुतील धक्कादायक घटना

IPL 2026: आयपीएल ब्रेकिंग! मुंबई-कोलकाता सामना संपताच मूत्यू; मुंबईतील हॅाटेलमध्ये सापडला मृतदेह

Guru Gochar 2026: नशिबाचा मास्टरस्ट्रोक! 'या' 5 राशींसाठी एप्रिल महिना ठरणार 'टर्निंग पॉईंट'; धन वर्षावासह करिअरमध्ये प्रगतीची संधी

Dailyhunt आणि Josh च्या प्रगतीला नवा वेग! पी. आर. रमेश आता सांभाळणार VerSe Innovation च्या ऑडिट कमिटीची धुरा

US Iran War: 21 युद्धनौका, 3500 कमांडो, 50000 सैनिक… तरीही ट्रम्प इराणचे 440 किलो युरेनियम जप्त करु शकणार नाहीत, कारण काय?

SCROLL FOR NEXT