law Dainik Gomantak
गोवा

Goa News: भू-रूपांतरासाठी नगरनियोजन कायद्यात होणार दुरुस्ती

Goa News: मंजुरीसाठी विधेयक विधानसभेत: ‘39अ’ कलम समाविष्ट करण्याची तजवीज

दैनिक गोमन्तक

Goa News: राज्यात प्रादेशिक आराखड्याच्या मूळ ढाच्याला धक्का न लावता, मुख्य नगररचनाकारांच्या पातळीवर भू-रूपांतर करता यावे यासाठी नगरनियोजन कायदा 1974 मध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे.

आता यापुढील भू-रूपांतरे या कायद्याच्या ‘39 अ’ कलमानुसार करता यावीत यासाठी कायदा दुरुस्ती विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले आहे. ते मंजूर होऊन अधिसूचित झाले की नवी दुरुस्ती नगरनियोजन खात्याला वापरता येणार आहे.

भू-रूपांतर करण्यासाठी या कायद्यामध्ये सरकारने याआधी ‘16ब’ कलमाचा समावेश केला होता. मात्र, ते कलम वादग्रस्त ठरले.

अखेर ते प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर न्यायालयाने त्या कलमाच्या वापरावर बंदी घातली आणि त्या कलमांतर्गत केलेले भू-रूपांतरांचे भवितव्य न्यायालयाच्या निवाड्यावर अवलंबून राहील असे स्पष्ट केले.

यामुळे प्रादेशिक आराखड्यात दुरुस्ती करण्यासाठी उपलब्ध असलेले ‘१७ अ’ कलम, वापरून भू-रूपांतर करण्यात येत असे. यासाठी अर्ज नगरनियोजन मंडळासमोर सादर करावा लागत असे. पान १५ वर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT