Ambulances of Kasarwarnem got rust Dainik Gomantak
गोवा

‘कासारवर्णे’च्या रुग्णवाहिकांना लागला गंज...

सरकारचे दुर्लक्ष: भंगारात काढण्याची,वा दुरुस्तीची मागणी

दैनिक गोमन्तक

मोरजी: पूर्व कासारवर्णे येथील हॉस्पिटल परिसरात असलेल्या रूग्णवाहिकांची दुर्दशा झाल्याचे तिथे भेट दिल्यावर आपल्या लक्षात येईल. या ठिकाणची वाहने गंजलेल्या स्थितीत आहेत. त्याकडे सरकारचे आणि आरोग्य खात्याचेही दुर्लक्ष झाल्याचा आरोप येथील लोकांकडून होत आहे.

पेडणे तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी, या उद्देशाने सरकारने कासारवर्णे पूर्वा येथे आणि तुये येथे हॉस्पिटल उभारलेले आहे. या दोन्ही हॉस्पिटलच्या परिसरात अनेक वाहने गंजलेल्या आणि सडलेल्या अवस्थेत आहेत. ती भंगार अडड्यात का दिली जात नाहीत, किंवा त्याच्या दुरुस्तीकडे आरोग्य खाते दुर्लक्ष का करते, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

कासारवर्णे पेडणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सात ते आठ रुग्णवाहिका गंजत पडल्या आहेत. एक ते‌ दोन सध्या रुग्णांच्या सेवेत आहेत. या वाहनांची योग्य ती विल्हेवाट न लावता आरोग्य केंद्राच्या परिसरात त्या तशाच उभ्या करून ठेवल्या आहेत. मोपा विमानतळ परिसरात कासारवर्णेचेच आरोग्य केंद्र आहे. कामगारांना प्रथमोपचारासाठी याच केंद्रात दाखल केले जाते. परंतु या आरोग्य केंद्राच्या परिसरात अनेक झुडपे वाढली आहेत. परिसरात स्वच्छता दिसत नाही. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी यात लक्ष घालून केंद्राची सुधारणा करावी, अशी मागणी सडेकर यांनी केली आहे.

ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी याच परिसरातील जागा निश्‍चित करण्यात आली आहे. या परिसरात वाढलेल्या झुडपांची साफसफाई करावी. परिसर स्वच्छ असला तर रोगराई पसरण्याचा धोका उपचारासाठी आलेल्या रुग्णांना राहणार नाही. पावसाळयापूर्वी या परिसराची स्वच्छता करावी.

-मोहन सडेकर, कासारवर्णे रहिवाशी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT