Amar Naik Shooting Case: Arrested Dainik Gomantak
गोवा

Amar Naik Shooting Case: मुख्य आरोपी लवकरच होणार गजाआड

दुबईत (Dubai) अटक (Arrested) करण्यासाठी गोवा पोलिसांनी केंद्रीय यंत्रणांशी संपर्क साधल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: बोगमाळो वास्को (Bogmalo Vasco) येथील अमर नाईक याच्या खून प्रकरणात (Amar Naik Murder Case) खुनाची सुपारी देणाऱ्या अमरच्या प्रेयसीच्या भावाला दुबईत (Dubai) अटक (Arrested) करण्यासाठी गोवा पोलिसांनी केंद्रीय यंत्रणांशी संपर्क साधल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसानी सर्व आरोपींनी संगनमताने कट रचून हा खून केल्याचा नवा गुन्हा आरोपीवर नोंद केला आहे. मिळालेल्या माहिती नुसार पोलिसांनी अमरच्या प्रेयसीच्या भावाच्या पासपोर्टची माहिती मिळवली असून ती केंद्रीय यंत्रणांना दिली आहे. या यंत्रणांमार्फत त्याला दुबईत अटक होण्याची शक्यता आहे.

अमरचे आपल्या बहिणीशी असलेले संबंध मान्य नसल्याने या संशयिताने आपला उत्तर प्रदेश मध्ये राहणारा मित्र रवीशंकर यादव याला 5 लाखांची सुपारी देऊन हा खून करवून आणला होता. या प्रकरणात या पूर्वी वास्को पोलिसांनी रविशंकर यांच्यासह एकूण तिघांना अटक केली आहे. दरम्यान, हा खून म्हणजे एक सुनियोजित खून असल्याने पोलिसांनी सर्व संशयितांच्या विरोधात भा. दं. सं. च्या 120 (ब) ( गुन्हेगारी कट कारस्थान रचणे) कलमाखाली नवा गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आरटीआयचा ऐतिहासिक विजय! 33 वर्षांनंतर कांदोळी ग्रामपंचायतीने हुडकून काढल्या 'त्या' नोंदी

Goa Politics: शंभर कोटींचा 'तो' आरोप काँग्रेसवरच उलटणार? गिरीश चोडणकरांच्या वक्तव्याने गोव्याच्या राजकारणात खळबळ!

Viral Video: ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या तरुणीसोबत घाणेरडा प्रकार; खाली उभ्या असणाऱ्या तरुणाने केले अश्लील कृत्य, व्हिडिओ व्हायरल!

Goa Government Schools: शाळा वाढल्या पण बाकडी रिकामी! 6 वर्षांत 49 सरकारी शाळा बंद, तर विनाअनुदानित शाळांमध्ये ८ ने वाढ!

डोंगर माफियांची खैर नाही! डोंगरकापणीवरून कुठ्ठाळीतील राजकारण तापले; चौकशीच्या फेऱ्यात अडकणार दोषी

SCROLL FOR NEXT