law Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: काले रेल्वे स्थानकातून खनिज नेण्यास परवानगी

Goa Mining: एका आठवड्याच्या आत काले रेल्वे स्थानक ते आडणे जेट्टीपर्यंत उर्वरित 2 हजार 25 मेट्रिक टन खनिज वाहतूक करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी परवानगी दिली.

दैनिक गोमन्तक

Goa Mining: एका आठवड्याच्या आत काले रेल्वे स्थानक ते आडणे जेट्टीपर्यंत उर्वरित 2 हजार 25 मेट्रिक टन खनिज वाहतूक करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी परवानगी दिली. काले भागातील खनिजाची हाताळणी आणि वाहतूक याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्य वन्यजीव संरक्षकांना चार आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.

उर्वरित 2,025 मेट्रिक टन खनिजाच्या व्यतिरिक्त काले रेल्वे स्थानकावर यापुढे कोणतेही खनिज हाताळणी आणि वाहतूक करू नये, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

पुढे आदेशात म्हटले आहे की, यापुढे काले रेल्वे स्थानकावर स्वतंत्रपणे खनिजाची हाताळणी आणि वाहतूक करण्यासाठी कंपन्यांनी एका आठवड्याच्या आत मुख्य वन्यजीव संरक्षकांकडे अर्ज करता येईल. अशा अर्जांवर चार आठवड्यांत निर्णय घ्यावा. परवानगी दिल्यास ती दोन आठवडे लागू होणार नाही.

दरम्यानच्या काळात या खटल्यातील याचिकादार गोवा फाउंडेशन मुख्य वन्य जीव संरक्षकांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागू शकेल.

काले रेल्वे स्थानकावर ११ हजार ५०० मेट्रिक टन खनिज आणण्यात आले होते, त्याची वाहतूक सुरू असताना ती बेकायदा असल्याचा दावा करत गोवा फाउंडेशनने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने अंतरिम आदेशाद्वारे खनिज वाहतुकीवर बंदी घातली होती.

त्या खानिजापैकी ९ हजार ५२६ मेट्रिक टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे. निर्यातीसाठी उर्वरित खनिजाची वाहतूक करणे आवश्यक असल्याचे ती करण्यास न्यायालयाने मान्यता दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT