Goa mining Dainik Gomantak
गोवा

खाणी सुरु होईपर्यंत दर महिना कामगारांना भत्ता द्यावा, मुख्यमंत्र्यांना निवेदन

खाणपिटे सुरक्षित करण्याची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन

दैनिक गोमन्तक

डिचोली : जोपर्यंत कामगारांना काम मिळत नाही. तोपर्यंत सरकारने या कामगारांना महिना किमान 15 हजार रुपये भत्ता द्यावा. त्यासाठी गोवा कामगार कल्याण मंडळाच्या धर्तीवर कपात कामगार कल्याण योजना तयार करावी. अशी मागणी आयटक नेते ख्रिस्तोफोर फोन्सेका यांनी खाण कामगारांच्यावतीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली. (Allowance should be given to the workers every month till the start of mining, a statement to the Chief Minister)

खाणी सुरु होताच सध्याच्याच कामगारांना काम मिळणार त्यासाठी सरकारने ठोस निर्णय घ्यावा. अशी मागणीही कामगार नेते फोन्सेका यांनी केली. असुरक्षित आणि पावसाळ्यात आपत्ती ओढवण्याची शक्यता असलेली खाणपिटे (खंदक) सुरक्षित करा. अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आयटकशी सलंग्न असलेल्या डिचोलीतील सेसासह (वेदांता), बांदोडकर, चौगुले आदी खाण कंपनीच्या कामगारांसमवेत ख्रिस्तोफोर फोन्सेका यांनी आज (गुरुवारी) साखळी येथे रवींद्र भवनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन खाण कामगारांच्या समस्यांवर चर्चा केली. यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, कामगार नेते सुहास नाईक तसेच विविध खाणीवरील कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

कामगारांचे हीत जपणार

ख्रिस्तोफोर फोन्सेका यांनी कामगारांचे विविध प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. खाणी सुरु करताना कामगारांना काम मिळावे त्यासाठी सरकार आग्रही आहे. महामंडळ वा लिजधारकांकडून खाणी सुरु झाल्या तर सध्याचे कामगार बेकार राहणार नाहीत. त्याची सरकार काळजी घेणार. अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी देऊन, कामगारांच्या अन्य मागण्या विचारात घेतल्या जातील. अशे स्पष्ट केले. मागण्यांचे निवेदनही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना देण्यात आले.

खाणपिटांपासून सुरक्षा

खाणपिटांतील पाण्याचा उपसा आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या नसल्यामुळे पावसाळ्यात काही खाणपिटांपासून धोका उद्भण्याची भीती आहे. तेव्हा खाणपिटे सुरक्षित करावीत. अशी मागणीही कामगार नेते ख्रिस्तोफोर फोन्सेका यांनी केली. खाणपिटांपासून सुरक्षा मिळावी, त्यासाठी सरकारने पावले उचलल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 09 November 2024: नवीन काम हाती घेण्याच्या विचारात असाल तर आजचं भविष्य नक्कीच जाणून घ्या !!

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: नोकऱ्यांचा लिलाव

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT