Taxi  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात ओला आणि उबरला परवानगी द्या: TTAG

राज्यातील 8792 टॅक्सींना डिजिटल मीटर बसविण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात ओला आणि उबर या टॅक्सी कंपनींना काम करण्यास परवानगी द्यावी या आपल्या जुन्या मागणीला ट्रॅव्हल अँड टूरिझम असोसिएशन ऑफ गोवा (TTAG) ने गुरुवारी परत एकदा उचलून धरले. याचबरोबर त्यांनी टॅक्सी (Taxi) मधील डिजिटल मिटरवर भाष्य केले. राज्यातील 8792 टॅक्सींना डिजिटल मीटर बसविण्यात आले असले तरी टॅक्सी चालक ते वापरत नाहीत आणि ग्राहकांकडून मनमानी दर आकारतात, याकडे टीटीजीने लक्ष वेधले. (Goa Taxi Ola Uber Latest News)

टीटीजीचे अध्यक्ष नीलेश शाह म्हणाले, "टॅक्सीमधील मीटर आता सुरू करायला हवेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2021 मध्ये गोव्याला (Goa) भेट दिलेल्या पर्यटकांना (Tourists) टॅक्सी चालकांनी पळवून लावले. गोवावासियांसाठी अधिक पर्याय उपलब्ध करण्याच्या हेतूने सरकारने ओला, उबर आणि गोवा माइल्सला प्रोत्साहन द्यावे."

10 जानेवारी 2022 पर्यंत एकूण 8792 टॅक्सींमध्ये डिजिटल मीटर बसवण्यात आले असून आणखी 171 टॅक्सींचे बुकिंग झाले आहे, असे संचालनालयाने सांगितले. राज्यात सुमारे 12,000 कार्यरत टॅक्सी आहेत, याचा अर्थ 73% टॅक्सींमध्ये मीटर बसविण्यात आले आहेत. सरकार अनेक दिवसांपासून टॅक्सी चालकांवर मीटर बसवण्यासाठी दबाव टाकत आहे. मात्र, डिजीटल मीटर बसवण्याला टॅक्सी चालकांनी विरोध केला असून त्यामुळे त्यांच्या कमाईवर परिणाम होईल असा त्यांचा दावा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT