Siolim Hotel Shootout Dainik Gomantak
गोवा

Siolim Hotel Shootout: शिवोली हॉटेलमध्ये गोळीबार प्रकरणी तिन्ही संशयितांना 5 दिवस पोलिस कोठडी

दारूच्या नशेत केला होता गोळीबार

Akshay Nirmale

Siolim Hotel Shootout: शिवोली येथील एका हॉटेलमध्ये गोळीबार करून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने जेम्स डिसुझा, मोहम्मद मनियार, सूरज सिंग या तिघाही संशयितांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

बुधवारी 1 वाजण्याच्या सुमारास वाडी-शिवोली येथील एल पॅत्रोन या रेस्टॉरन्टमध्ये घडला होता. पोलिसांनी या प्रकरणी तिघा संशयितांना अटक केली होती. जून 2022 मध्ये संशयित सोझा याने दारूच्या नशेत पिस्तूलातून गोळी झाडून म्हापशात दहशत माजवली होती. त्यावेळी म्हापसा पोलिसांनी त्याच्यासमवेत दोघा संशयितांना अटक केली होती.

वाडी-शिवोली येथील एल पॅत्रोन या रेस्टॉरन्टमध्ये बुधवारी 1 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपींचा चार-पाच जणांचा गट आला. संशयित रेस्टॉरन्टच्या बार काऊंटरसमोर उभे राहिल्याने रेस्टॉरन्ट चालक अक्षद शेट्ये यांनी त्यांना बाजूला राहण्याची सूचना केली.

त्यावरुन संशयितांनी त्यांच्याशी वाद घातला व शिवीगाळ केली. यावेळी त्याच्यातील संशयित जेम्स सोझा याने त्याच्याकडील पिस्तूल काढले व रेस्टॉरन्ट चालकावर पिस्तूलाची गोळी झाडली.

यात सुदैवाने रेस्टॉरन्ट चालक बचावले. तसेच संशयिताने रेस्टॉरन्ट चालक व कामगारांना यावेळी धमकी दिली व तेथून निघून गेला. दरम्यान, रेस्टॉरंट मालकाने या घटनेबाबत बुधवारी हणजूण पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारीच्या आधारे म्हापसा पोलिसांनी जेम्स डिसोझा (44) रा. धुळेर बार्देश, मोहम्मद मणियार (29) रा. करासवाडा, बार्देश यांना अटक केली होती. तर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला तिसरा संशयित सूरज सिंग (19) रा. करासवाडा याला थिवी रेल्वे स्थानकावरुन अटक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT