Nishant Shenai 
गोवा

गोव्याच्या निशांतचा झुंजार खेळ

ज्युनियर मानांकन बॅडमिंटन: हरियानाच्या मानांकित उन्नतीची आगेकूच

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याच्या निशांत शेणई याने यजमानांचे अखिल भारतीय ज्युनियर (19 वर्षांखालील) मानांकन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान कायम राखताना सोमवारी झुंजार खेळ केला. हरियानाची मानांकित खेळाडू उन्नती हुडा हिने मुलींत आगेकूच राखली. (All India Junior Ranking Badminton; Aggressive innings by Nishant Shenai of Goa )

स्पर्धा नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये सुरू आहे. ज्युनियर मुलांच्या एकेरीत पुढील फेरी गाठणारा निशांत हा एकमेव गोमंतकीय बॅडमिंटनपटू आहे. विजयासाठी त्याला केरळच्या एस. एम. अमन सुरेश याच्याविरुद्ध संघर्ष करावा लागला.

एक तास 14 मिनिटे चाललेल्या चुरशीच्या लढतीत निशांतने पहिला गेम गमावल्यानंतर 13-21, 30-29, 21-19 अशी बाजी मारली. निशांतने जबरदस्त कमबॅक साधले, पण राज्याचा द्वितीय मानांकित अनीश कामत याला सूर गवसला नाही. सानिध्य शर्मा याच्याकडून त्याला 21-16, 21-10 असा पराभव स्वीकारावा लागला.

स्पर्धेचे उद्‍घाटन क्रीडामंत्री गोविंद गावडे, आमदार दिगंबर कामत, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक अजय गावडे, मडगावचे नगराध्यक्ष लिंडन परेरा, मडगाव मालिकेचे मुख्याधिकारी रोहित कदम, भारतीय बॅडमिंटन संघटनेचे निरीक्षक मयूर पारीख, गोव्याची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अनुरा प्रभुदेसाई यांच्या उपस्थितीत झाले. गोवा बॅडमिंटन असोसिएश ही स्पर्धा भारतीय बॅडमिंटन संघटना, उत्तर गोवा जिल्हा बॅडमिंटन संघटना आणि गोवा क्रीडा प्राधिकरण यांच्या सहकार्याने घेत आहे.

मुलींत गोव्याचे खेळाडू पराभूत

मुलींत गोव्याचे आव्हान पहिल्या फेरीतच आटोपले. निधी देसाई हिचा तारा शाह हिने अवघ्या 18 मिनिटांत 21-5, 21-5 असा धुव्वा उडविला. जान्हवी महाले हिला माहनूर कौर हिने 27 मिनिटांत 21-17, 21-16 असे हरविले.

मुलींत प्रमुख खेळाडूंचा धडाका

भारतीय महिला बॅडमिंटनमधील आश्वासक खेळाडू असलेल्या सहाव्या मानांकित हरियानाच्या उन्नती हुडा हिने धडाका राखला. तिने केपीएस प्रज्ञा हिला 26 मिनिटास 21-9, 21-10 असे नमविले. चौथी मानांकित अनुपमा उपाध्याय हिने रुजुला रामू हिच्यावर 21-15, 21-11 असा विजय संपादन केला. उत्तर प्रदेशची समायरा पनवर आणि मध्य प्रदेशची प्रियांका पंत यांच्यात तब्बल तासभर चाललेली लढत रंगतदार ठरली. अखेरीस समायरा हिने 20-22, 21-19, 24-22 असा विजय प्राप्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT