MLA Alex Sequeira Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: आलेक्स सिक्वेरांनी गाठली थेट दिल्ली

Goa Politics: निमित्त वाढदिवसाचे: जे. पी. नड्डांची भेट घेऊन दिल्या शुभेच्छा

दैनिक गोमन्तक

Goa Politics: राज्य मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेल्या आलेक्स सिक्वेरा यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत आज दिल्ली गाठली. सायंकाळी उशिरा त्यांनी नड्डा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट झालेल्या नेत्याला नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी नेण्याची पद्धती आहे. शक्यतो मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत किंवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे अशा नेत्यांसोबत जातात.

औपचारीक भेट एवढेच त्याला संबोधण्यात येते. सिक्वेरा यांनी मात्र अशा संधीची वाट न पाहता स्वतःच दिल्ली गाठली. त्यांनी नड्डा यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

याबाबत सिक्वेरा यांना विचारले असता ते म्हणाले, नड्डा यांच्या वाढदिवसाव्यतिरीक्त दिल्लीत येण्यासाठी दुसरे कोणते निमित्त असू शकते? आज त्यांच्या वाढदिनानिमित्त दिल्लीत येऊन शुभेच्छा दिल्या.

सर्वसाधारणतः दोन राजकारणी भेटतात तेव्हा ते राजकारणावर बोलतात असे लोकांना वाटते, त्यात तथ्यही असू शकते, पण आज वाढदिवसानिमित्त अनेकांची त्यांच्या निवासस्थानी ये जा होती.

त्यामुळे आणखीन कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही. औपचारीकरीत्या जी विचारणा केली जाते तशी त्यांनी विचारणा केली. अन्य कोणाला भेटायचे नियोजन नसल्याने मी रात्रीच गोव्यात परत आलो.

सिक्वेरांनी केली हिंमत

दिल्लीत राज्याचा मंत्री जाण्याआधी तेथील निवासी आयुक्तांना कल्पना दिल्यावर सर्व व्यवस्था केली जाते. सिक्वेरा हे पूर्वीही मंत्री होते. यामुळे त्यांना दिल्ली नवी नाही. त्या अनुभवाच्या आधारे त्यांनी भाजप सरकारमधील नवा मंत्री असूनही दिल्ली गाठण्याची हिंमत दाखवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT