Alex Reginald Lawrence Dainik Gomantak
गोवा

रेजिनाल्ड यांचा भगवा फेटा मोठा चर्चेचा विषय; हालचालींबाबत उत्सुकता

भाजप नेत्‍यांशी जवळीकही वाढली, निवडणुकीवेळी भाजपचा मदतीचा ‘हात’?

दैनिक गोमन्तक

मडगाव : कुडतरीचे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्‍स हे विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून या ना त्या कारणामुळे चर्चेत आहेत व मतदान आटोपून मतमोजणीचा दिवस जवळ येत असला तरी त्यांच्यावरील चर्चा सुरूच आहेत.

आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्‍स (alex reginald lawrence) चर्चेत येण्याचे ताजे कारण आहे ते शनिवारी त्यांच्या मतदारसंघात आयोजित केल्या गेलेल्या शिवजयंती मिरवणुकीत त्यांनी भगवा फेटा बांधून लावलेली उपस्थिती. तसे गेल्या काही वर्षांत त्यांनी या मिरवणुकीला आवर्जून उपस्थिती लावली होती व भगवा फेटाही बांधला होता. पण त्यावर इतकी चर्चा कधीच झाली नव्हती. काल त्यांच्यासोबत भाजप नेते, माजी आमदार व फातोर्डा मतदारसंघाचे उमेदवार दामू नाईक हेही होते. त्यामुळे या चर्चेला आणखीन घुमारे फुटलेले आहेत.

दरम्‍यान, राजकीय (Politics) निरीक्षकांच्या मते रेजिनाल्डना जिंकण्याची संधी आहे. तसे झाले तर ते भाजपला समर्थन देऊ शकतात. त्यांच्या भगव्या फेट्याकडे त्याच नजरेतून पाहिले जात आहे.

निवडणुकीवेळी भाजपचा मदतीचा ‘हात’?

यावेळी रेजिनाल्ड हे कुडतरीत अपक्ष म्हणून जरी उभे असले तरी भाजपने त्यांना आतून पाठिंबा दिल्याचे तसेच कुडतरीत अंतर्भूत असलेल्या मडगाव पालिकेतील भाजप नगरसेवकांनी त्यांच्यासाठी काम केल्याची चर्चा आहे. खुद्द कुडतरीतील भाजप (BJP) उमेदवारानेही तसा आरोप केला आहे. पण त्याची विशेष दखल भाजप नेतृत्वाने घेतलेली नाही. त्यामुळे त्यात तथ्य आहे असे मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT