Simon Barreto Dainik Gomantak
गोवा

'लॉरेन्स यांनी सरकारी यंत्रणा हाताशी धरलीय'

'हा' घोळ दूर न झाल्यास कोर्टात जाणार; कुडतरी सदस्यांचा इशारा

दैनिक गोमन्तक

मडगाव : कुडतरी पंचायतीत प्रभाग फेररचना करताना मोठ्या प्रमाणावर घोळ करून ठेवला असून ही फेररचना करताना मतदारसंख्येची समानता या तत्वाला हरताळ फासला आहे. हे प्रभाग ठरवताना भौगोलिक सलागताही ठेवण्यात आलेली नाही असा आरोप केला असून, फेरराचनेतील या त्रुटी दूर केल्या नाहीत तर सर्व प्रक्रियेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचा इशारा दिला.

माजी जिल्हा पंचायत (Panchayat) सदस्य मोरेन रिबेलो यांनी सरपंच मिलाग्रीस रोड्रिक्स व उपसरपंच सायमन रिबेलो यांच्या बरोबर मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा इशारा दिला.

कुडतरी पंचायतीचे काही प्रभागात 1400 पेक्षा जास्त मतदार असून काही प्रभागात फक्त 500 मतदार आहेत. त्याशिवाय दीड किलोमीटर अंतरावरील भाग दुसऱ्याच प्रभागात जोडून भौगोलिक सलगताही ठेवण्यात आलेली नाही. मागच्या वेळी जे प्रभाग राखीव होते तेच पुन्हा राखीव करण्यासाठी त्यांचे क्रमांक बदलले आहेत. या सर्व त्रुटी दुर करूनच निवडणूक (Election) घ्यावी अथवा जुन्या प्रभाग रचनेनुसार निवडणूक घ्यावी अशी मागणी यावेळी रोड्रिक्स यांनी केली.

तर कुडतरीचे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (alex-reginald-lawrence) यांना आपल्या काही विरोधकांना पंचायती पासून दूर ठेवायचे असल्याने त्यांनीच सरकारी यंत्रणेला हाताशी धरून हे कारस्थान केले असावे असा आरोप सायमन बार्रेटो यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT