ALEX REGINALD.jpg 
गोवा

Covid-19 Goa: "कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी राज्यात महाराष्ट्र मॉडेल राबवा"   

दैनिक गोमंतक

सासष्टी: राज्यात कोरोनाची तिसरी लाट (Covid-19 Third Wave) येणार असल्याची चर्चा असून या लाटे विरूद्ध लढण्यासाठी आतापासून उपाययोजना करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरच्या  तिसऱ्या लाटेविरुध्द लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात आरोग्यसंबंधी साधनसुविधा उभारण्यात येत असून गोवा सरकारने (Goa Government) गोव्यात महाराष्ट्राचा मॉडेल (Maharashtra Model) राबवावा, अशी मागणी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड (ALEX REGINALD) यांनी केली. (Alex Reginald has demanded that the Maharashtra model be implemented in the state for the third wave of corona.)

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्य चालविण्यासाठी  काही गोष्टी कराव्या लागतात असे सांगितले आहे. पण, सध्याच्या परिस्थितीत काही गोष्टी करून फायदा नसून आवश्यक गोष्टी करण्यावर सरकारने भर देणे आवश्यक आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य सुविधा बळकट करणे आवश्यक असून यासाठी सरकारने परराज्यातील डॉक्टर तसेच तज्ञांकडून सल्ला घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्य तिसऱ्या लाटेची तयारी सुरू असून गोव्याला तिसऱ्या लाटेसाठी सज्ज बनविणे अतिआवश्यक आहे, असे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी  सांगितले. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरुद्ध लढण्यासाठी अनेकजण मदत करण्यास तयार असून एकामेकांवर आरोप करणे बंद करून लोकांच्या भल्यासाठी काम करणे महत्वाचे आहे. सध्याच्या काळात सर्व नकारात्मक गोष्टी बाजूला सारून एक क्षणही वाय जाऊ न देता,सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे, असे आलेक्स रेजिनाल्ड यांनी सांगितले. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील कोरोनाची स्थिती अद्यापही नियंत्रणात  आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT