Churchill Alemao  Dainik Gomantak
गोवा

Alemao Family Politics : गोव्यात फॅमिली राजसाठी प्रसिद्ध आलेमाव कुटुंबात गृहकलह?

बाणावली मतदासंघातून यावेळी हद्दपार झालेल्या चर्चिल आलेमाव यांनी पुढची निवडणूक म्हणे आपला पुतण्या युरी आलेमाव हे सध्या प्रतिनिधित्व करत असलेल्या कुंकळ्ळी मतदारसंघातून लढविण्याचे निश्चित केले आहे.

सुशांत कुंकळयेकर

Alemao Family Politics : आगामी 2027 च्या विधानसभा निवडणुकीत कदाचित यापूर्वी ‘फॅमिली राज’ राजकारणामुळे प्रत्येकवेळी चर्चेत असणाऱ्या आलेमाव घराण्यात गृहकलह माजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण बाणावली मतदासंघातून यावेळी हद्दपार झालेल्या चर्चिल आलेमाव यांनी पुढची निवडणूक म्हणे आपला पुतण्या युरी आलेमाव हे सध्या प्रतिनिधित्व करत असलेल्या कुंकळ्ळी मतदारसंघातून लढविण्याचे निश्चित केले आहे.

मुख्य म्हणजे या बातमीला खुद्द चर्चिल आलेमाव यांनीच दुजोरा दिला आहे. चर्चिल आलेमाव यांच्याशी या विषयावर बोलणी झाली असता, कुंकळ्ळीचे कित्येक लोक माझ्याकडे आले असून त्यांनी मला या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह केला आहे. मी जरी त्यावर अंतिम निर्णय घेतलेला नसला, तरी त्यावर आपला विचार चालू आहे असे स्पष्टपणे सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, चर्चिल आलेमाव यांनी कुंकळ्ळी मतदासंघातील आपले जुने कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक यांच्या गाठीभेटी घेणेही सुरू केले आहे. यापूर्वी चर्चिल आलेमाव हे बाणावलीचे आमदार होते, तर त्यांचे बंधू ज्योकी आलेमाव हे कुंकळ्ळीचे आमदार होते. आता त्यांचे पुतणे युरी आलेमाव हे या मतदासंघाचे आमदार आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीवेळी या दोन्ही कुटुंबांमध्ये वितुष्ट आल्याची माहिती असून चर्चिल यांची हे खेळी त्याचाच पुढचा भाग असल्याचे सांगितले जाते. यासंबंधी युरी आलेमाव यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांना फोन केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

‘लोकसभा निवडणुकीत स्वारस्य नाही’

यापूर्वी चर्चिल आलेमाव 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार असे सांगितले जात होते. याबद्दल त्यांना विचारले असता, मला लोकसभा निवडणूक लढविण्यात स्वारस्य नाही, असे त्यांनी सांगितले. कुंकळ्ळीतून निवडणूक लढवली, तर कोणत्या पक्षाच्या उमेदवारीवर लढवणार असा त्यांना प्रश्न केला असता, पक्ष कोणता त्याचा निर्णय मागाहून घेता येईल, असे ते म्हणले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मीन राशीला शनीचा दणका! 40 दिवस 'अस्त', 138 दिवस 'वक्री' राहून कोणत्या राशींचे उघडले भाग्याचे दरवाजे?

गोव्यात निवडणुकीच्या तयारीला वेग! 91 टक्क्यांहून अधिक मतदारांची गणना पूर्ण; सीईओ संजय गोयल यांचा खुलासा

'शार्क टँक'ची Namita Thapar गोव्यात! ''12 तासांच्या शूटिंगमधून सुटका'' म्हणत शेअर केले फोटोज; व्हेकेशन लूक होतोय Viral

Goa voters missing: गोव्यातील एक लाख 78 हजार मतदार गहाळ; 10 लाख 84 हजार 956 मतदारांची नोंद

Illegal club Goa: वागातोरमधील प्रसिद्ध 'कॅफे CO2' चे शटर डाऊन! 250 आसनक्षमतेचा क्लब बेकायदेशीर

SCROLL FOR NEXT