Senior Citizens Day Helpline Dainik Gomantak
गोवा

ज्येष्ठ नागरिकांसाठी 'गुड न्यूज'! विशेष हेल्पलाईन होणार सुरु; समाज कल्याणचा 'अलंकित’शी करार

Goa News: समाज कल्याण खात्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरु करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी खात्यातर्फे ‘अलंकित’ असाईनमेंट्स लिमिटेड कंपनीशी सामंजस्य करार केला

गोमन्तक डिजिटल टीम

Helpline For Senior Citizens By Social Welfare Department

सासष्टी: समाज कल्याण खात्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरु करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून खात्यातर्फे ‘अलंकित’ असाईनमेंट्स लिमिटेड कंपनीशी सामंजस्य करार केला.

या करारावर आज मडगाव रवींद्र भवनात आयोजित कार्यक्रमात खात्याचे संचालक अजित पंचवाडकर व कंपनीचे उपाध्यक्ष संजय भट यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी मडगावचे आमदार दिगंबर कामत, समाज कल्याण खात्याचे सचिव ई वल्लवन (आयएएस) उपस्थित होते.

यावेळी १४ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारही करण्यात आला. प.बंगाल व लक्षद्वीप वगळता इतर सर्व राज्यांमध्ये ही हेल्पलाईन उपलब्ध असून ४५ दिवसांत किंवा तत्पूर्वी गोव्यातही सुरू केली जाईल,असे कंपनीचे उपाध्यक्ष संजय भट यांनी सांगितले.

आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मतदार म्हणूनही ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. ज्येष्ठांबद्दल तर सर्व समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांना कुठे ना कुठे गुंतवून ठेवणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सूर्यकांत नाईक देसाई, इडा रोजमिलर मुखर्जी, चंद्रनाथ धुमे, श्रीपाद गोविंद पालयेकर, रोहिदास हरमलकर, देवकी गावकर, अजित हेगडे, आवेलिनो मास्कारेन्हस, अरविंद वाडीकर, चंद्रकांत दुर्गा माईणकर, माधव केशव प्रभुदेसाई, गीतांजली देसाई, शांताजी नाईक गावकर, शशिकांत केरकर यांचा सत्कार करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT