Goa Monsoon Session 2024, CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: बचत गटांकडेच माध्‍यान्‍ह आहार कंत्राट!

Pramod Sawant: पूर्ण वेळ शाळा झाल्यावर दुपारचे जेवण पुरविण्याचे कंत्राट ‘अक्षय पात्र’ला दिले जाईल

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: शाळांना माध्यान्ह आहार पुरविण्याचे कंत्राट महिला बचत गटांकडून काढून घेऊन ते ‘अक्षय पात्र’ला दिले जाणार नाही. तर, यापुढे नववी ते बारावीसाठी माध्यान्ह आहार सुरू केल्यावर तसेच पूर्ण वेळ शाळा झाल्यावर दुपारचे जेवण पुरविण्याचे कंत्राट ‘अक्षय पात्र’ला दिले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिक्षणमंत्री या नात्‍याने आज विधानसभेत दिली.

डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी याबाबत प्रश्‍‍न विचारला होता. ते म्हणाले, मुलांना देण्‍यात येणारा आहार पौष्टिक असावा यासाठी सरकारने समिती नेमली होती. या समितीच्या अनेक बैठका झाल्या आणि शेवटच्या बैठकीत दर दोन आठवड्यांनी खाद्यपदार्थ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात तसे केले जात नाही.

फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना सांगितले की, सरकार महिला बचत गटांची माध्यान्ह आहार पुरवण्याची बिले वर्षानुवर्षे अदा करत नाही. याचा परिणाम आहाराच्‍या गुणवत्तेवर होतो.

अलीकडेच २ कोटी ४१ लाख रुपयांची बिले सरकारने दिली, पण गेल्या वर्षीचे २ कोटी ८६ लाख रुपये अद्याप सरकारने बचत गटांना दिलेले नाहीत.

यावर बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, माध्यान्ह आहाराच्या गुणवत्तेवर अन्न व औषध प्रशासन खात्याचे लक्ष असते. या खात्याकडून नियमितपणे आहाराचे नमुने तपासले जातात. गुणवत्ता, चव व प्रमाण तपासले जाते. त्यात काही त्रुटी आढळल्या तर माध्यान्ह आहार पुरविण्यास बचत गटावर काही काळासाठी बंदी घातली जाते.

राज्‍य, केंद्र सरकार उचलते खर्चाचा भार सर्वसाधारणपणे ग्रामीण भागातील मुले माध्यान्ह आहार घेतात, तर शहरातील मुले घराकडून खाद्यपदार्थ आणतात. ‘अक्षय पात्र’ ही केंद्र सरकारची योजना आहे. सुरूवातीला केंद्र सरकार ६० टक्के आणि राज्य सरकार ४० टक्के रक्कम देत असे.

आता राज्य सरकार ५२ टक्के तर केंद्र सरकार ४८ टक्के खर्चाचा भार उचलते. कित्येकदा तिमाही सोडा, सहा महिन्यांनीही विद्यालयांमार्फत शिक्षण खात्याकडे बिले सादर केली जात नाहीत. त्‍यामुळे बिले अडून पडतात. बिले ऑनलाईन सादर करण्यासाठी ऑनलाईन समान पद्धती सरकार विकसित करेल. त्‍यामुळे तिमाही पद्धतीने बिले अदा करणे सरकारला शक्य होईल, असे मुख्‍यमंत्री सावंत म्‍हणाले.

गेल्‍या वर्षीचे पैसे महिला बचत गटांना अद्याप मिळालेले नाहीत. तिमाही पद्धतीने स्वयंसेवी गटांना त्यांची बिले मिळतील अशी व्यवस्था सरकारने करणे गरजेचे आहे. दरदिवशी भाज्या महाग होत आहेत, इतरही भाववाढ होत चालली आहे. त्‍यामुळे दरवर्षी स्वयंसेवी गटांना किमान दरवाढ मिळेल याकडे सरकारने लक्ष द्यावे.
विजय सरदेसाई, आमदार (फातोर्डा)
देशातील १४ राज्यांमध्ये ‘अक्षय पात्र’तर्फे माध्यान्ह आहार पुरविला जातो. त्यांचा कल व्यवसायापेक्षा विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार कसा मिळेल याकडे असतो. शिक्षण खात्याने त्यांच्याशी सामंजस्य करार केलेला आहे. मात्र त्यांना कोणतेही काम सोपविण्यात आलेले नाही.
डॉ. प्रमोद सावंत, शिक्षणमंत्री
शालेय मुलांना तेच तेच खाद्यपदार्थ दिले जातात. त्‍यामुळे मुले माध्यान्ह आहार घेत नाहीत. आपल्याला काय आवडते, काय आवडत नाही, याची माहिती मुले पालकांना देतात. सरकारने पालकांशी संवाद साधावा. ‘अक्षय पात्र’कडे हे काम सोपवल्‍यास शेकडो महिला बेरोजगार होतील.
डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT