Goa CM Pramod Sawant And MLA Sachin Kalyanshetty Dainik Gomantak
गोवा

मित्राचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी लावली हजेरी; रेकॉर्डब्रेक मताधिक्याचा व्यक्त केला विश्वास

Solapur: सचिन कल्याणशेट्टी यांना यावेळी मोठ्या संख्येने मतदार निवडून येतील असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

Pramod Yadav

सोलापूर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून वर्णी लागलेले गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रचारात सक्रिय झाले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या रणधुमाळीत त्यांनी अक्कलकोट विधानसभेचे आमदार भाजप उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांचा अर्ज भरण्यासाठी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत देखील हजर होत्या.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या खांद्यावर महाराष्ट्र विधानसभेत स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. सावंत यांनी आज सकाळी सचिन कल्याणशेट्टी यांच्या अक्कलकोट मतदारसंघात हजेरी लावत, श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत, आमदार सचिन कल्याणशेट्टी व त्यांच्या पत्नी व मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठ्या प्रमाणावर पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सचिन कल्याणशेट्टी यांना यावेळी मोठ्या संख्येने मतदार निवडून येतील असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. कल्याणशेट्टी लोकांमध्ये मिसळणारा, लोक कल्याणकारी योजना राबवणारा लोकप्रिय नेता असल्याचे मत यावेळी सावंत यांनी व्यक्त केले.

सचिन युवा वर्गामध्ये क्रेझ असणारे नेते आहेत. यावेळी रेकॉर्डब्रेक मताधिक्याने ते निवडून येतील, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

यानिमित्ताने काढलेल्या प्रचार रॅलीत देखील मुख्यमंत्री सावंत यांनी कल्याणशेट्टी यांच्यासोबत सहभाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT