Goa NCP 
गोवा

Goa NCP: गोव्यात अजित पवार गटाला मिळाला नेता, प्रफुल्ल पटेलांकडून राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती

गोव्यातील राष्ट्रवादी शरद पवार यांच्या सोबतच असल्याची माहिती राज्यातील नेत्यांनी दिली होती.

Pramod Yadav

Goa NCP: महाराष्ट्रात सुरुवातीला शिवसेनेत फूट पडल्यानंतर एका वर्षात राष्ट्रवादीत देखील फूट पडली. अजित पवार आणि शरद पवार अशी ही फूट असून, दोन्ही गट आपापली कार्यालय आणि नेते यांची नियुक्ती करत आहेत.

गोव्यातील राष्ट्रवादी शरद पवार यांच्या सोबतच असल्याची माहिती राज्यातील नेत्यांनी दिली होती. पण, अखेर बऱ्याच कालावधीनंतर अजित पवार गटाला नेता मिळाला असून, प्रफुल्ल पटेल यांनी नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली आहे.

शंभू मधुकर परब यांची गोवा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी परब यांच्या नियुक्तीचे पत्र जारी केले आहे.

परब राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतील अशी आशा पटेल यांनी व्यक्त केली आहे.

गोव्यातील राष्ट्रवादी शरद पवार यांच्या सोबत असल्याची ग्वाही राज्यातील पक्षाच्या नेत्यांनी दिली होती. त्यानंतर अजित पवार गटाला नेता मिळाला असून, गोव्यात देखील राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शरद पवार अशी गटबाजी पाहायला मिळणार आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष चर्चिल आलेमाव यांनी अलिकडेच तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्याचवेळी प्रफुल्ल पटेल यांनी चर्चिल यांची भेट घेतली होती. चर्चिल राष्ट्रवादीत प्रवेश करणार का अशी चर्चा सुरु असताना चर्चिल यांनी पक्षप्रवेशाची शक्यता खोडून काढत पटेल यांच्याशी झालेली भेट राजकीय नसल्याचे स्पष्ट केले होते.

दरम्यान, गोव्यात अजित पवार गटाला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाल्याने राज्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या राजकारणात कसा बदल होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT