Union Minister of State for Home Affairs Ajay Kumar Mishra Dainik Gomantak
गोवा

'हिंदी भाषेमुळे देशाची एकता आणि एकात्मता अबाधित'

राजभाषा संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा (Union Minister of State for Home Affairs Ajay Kumar Mishra) यांनी आपल्या भाषणात सांगितले.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: हिंदी भाषेमुळे (Hindi languages) भारत देशाची एकता व एकात्मता अबाधित राहिली. या भाषेमुळे देशाची संस्कृती व परंपरा अधिक समृद्ध बनली असे मत केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या राजभाषा संचालनालयातर्फे आयोजित एक दिवसीय पश्र्चिम-मध्य संयुक्त क्षेत्रीय राजभाषा संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा (Union Minister of State for Home Affairs Ajay Kumar Mishra) यांनी आपल्या भाषणात सांगितले.

फातोर्डा येथील रवीन्द्र भवनच्या मुख्य सभागृहात आयोजित या राजभाषा संमेलनाला वेगवेगळ्या राज्यातील केंद्र सरकारच्या विविध खात्यातील अधिकारी व बॅंकाचे अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी राजभाषा हिंदी संदर्भात उत्कृष्ट काम केलेल्या केंद्रीय खाती व बॅंकांना 2017-18, 18-19, 19-20 या तीनही वर्षातील पारितोषिके प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यंटन, बंदर, जल वाहतुक व नौवहन राज्यमंत्री श्रीपाद नाईक (Shripad Naik) प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. राजभाषा संचालनालयाच्या सचिव अंशुली आर्या, संयुक्त सचिव डॉ. मिनाक्षी ज्यॉली, संचालनालयाचे निर्देशक बी. एल मिना हे मान्यवर उपस्थित होते. आमच्या देशात विभिन्न संस्कृती आहे. पण हिंदी भाषेमुळे ही संस्कृती एकमेकाशी जोडली गेली आहेत. देश स्वतंत्र झाला तेव्हा वेगवेगळ्या भाषेमुळे भाषेसंबंधी अनेक प्रश्र्न उपस्थित झाले होते.

पण तेव्हा हिंदीलाच राजभाषा म्हणुन निवडली गेली. गेल्या सहा-सात वर्षांत हिंदी भाषेचा भरपुर विकास झाला आहे. सद्या देशा, 90 कोटी पेक्षा जास्त लोकांना हिंदी बोलता, लिहता व वाचता येते. तर 30 करोडपेक्षा जास्त लोकांना हिंदीचा अभ्यास आहे असेही गृहराज्यमंत्री मिश्रा यानी माहिती दिली. कोविड महामारीच्या काळातही प्रधानमंत्री मोदी (Prime Minister Modi) कोविड महामारीच्या काळातही प्रधानमंत्री मोदी व गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यानी हिंदी द्वारेच लोकांपर्यंत संपर्क साधला त्यामुळे सरकारने या महामारी संबंधी घेतलेल्या उपाय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचू शकली असेही मिश्रा यानी सांगितले. हिंदीमुळेच विदेशातही भारतीय संस्कृतीचा प्रसार व प्रचार होत आहे. इतर देशातील भारतीय दुतावासातही हिंदीचा उपयोग सुरु झाल्याचे मिश्रा यानी सांगितले.

हिंदी भाषा म्हणजे देशाची ओळख असे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यानी सांगितले.हिंदी ही सशक्त. सदृष्य व जनमानसातील भाषा आहे. सरकारी कारभारात हिंदी बरोबर इतर स्थानिक भाषांचाही उपयोग झाला पाहिजे असे त्यांनी सांगितले. शिवाय हिंदी समृद्ध बनविण्यासाठी इतर भाषांचेही योगदान महत्वाचे आहे व त्यासाठी हिंदी साहित्य इतर स्थानिक भाषांमध्ये तर स्थानिक भाषातील साहित्य हिंदीतुन अनुवादीत झाले पाहिजे असे त्यानी सुचविले.

राजभाषा संचालनालयाच्या सचिव अंशुली आर्या यानी राजभाषा संचालनालयाच्या कार्याचा आढावा घेतला. हिंदीच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग सुरु झाला आहे. त्यासाठी हिंदी शब्दकोष, वेगवेगळे अॅप, अनुवाद करण्याची साधने उपलब्ध करण्यात आल्याची माहिती त्यानी दिली. संयुक्त सचीव मिनाक्षी ज्यॉली यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. संध्याकाळच्या सत्रात हिंदी भाषेंच्या विकास व उपयोगासंदर्भात चर्चा संत्राचे आयोजन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT