Ahmedabad - Thivim - Ahmedabad Bi-Weekly Special Train Time Table, Booking, Route
नाताळ आणि आगामी विविध उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या वतीने अहमदाबाद - थिवी - अहमदाबाद द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन सुरु करण्याची घोषणा केलीय. ०८ डिसेंबर २०२४ ते ०२ जानेवारी २०२५ या दरम्यान ही विशेष ट्रेन धावणार आहे. उत्सवाच्या काळात पर्यटकांना गोव्यात प्रवास करने सुलभ व्हावे तसेच इतर वाहतूक साधनांवर होणारा ताण कमी व्हावा, या उद्देशाने ही द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली आहे.
अहमदाबाद (गुजरात) ते थिवी (गोवा) ट्रेन क्रमांक - ०९४१२ (Ahmedabad - Thivim - Ahmedabad Bi-Weekly Special Train Number 09412)
अहमदाबाद येथून ही ट्रेन दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता थिवी (गोवा) येथे पोहोचेल. ०८ डिसेंबर २०२४ ते ०१ जानेवारी २०२५ याकाळात ही ट्रेन प्रत्येक आठवड्यात रविवार आणि बुधवारी धावेल.
थिवी ते अहमदाबाद ट्रेन क्रमांक - ०९४११ (Ahmedabad - Thivim - Ahmedabad Bi-Weekly Special Train Number 09411)
अहमदाबादमधून गोव्यात दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी थिवी येथून ही ट्रेन माघारी जाईल. थिवी येथून सकाळी ११. ४० वाजता ही ट्रेन सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०८.४५ अहमदाबादमध्ये पोहोचेल. ०८ डिसेंबर २०२४ ते ०१ जानेवारी २०२५ याकाळात ही ट्रेन प्रत्येक आठवड्यात सोमवार आणि गुरुवारी धावेल.
थांबा! या स्थानकांवर थांबणार ट्रेन (Halt/ Stop)
अन्नाड, वडोदरा, भरुच, उधना जंक्शन, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, मानगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड आणि अखेरीस थिवी स्थानकावर ट्रेन थांबेल.
डब्ब्यांची संख्या (Coach Positions)
अहमदाबाद - थिवी - अहमदाबाद द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेनमध्ये एकूण १५ एलएचबी कोच असतील.
२ टीयर एसी कोच - ०१
३ टीयर एसी कोच - ०६
स्लीपर कोच - ०६
जनरेटर कार - ०१
एसएलआर - ०१
Gujrat - Goa Christmas Special Train Information
अहमदाबाद - थिवी - अहमदाबाद द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेनच्या माहितीसाठी भारतीय रेल्वेच्या enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देता येईल किंवा NTES Mobile Application डाऊनलोड करता येईल.
या विशेष ट्रेनचे बुकिंग ०७ डिसेंबर २०२४ पासून सुरु होईल. प्रवाशांना पीआरएस सुविधा किंवा आयआरसीटीच्या संकेतस्थळावरुन बुकिंग करता येईल. ट्रेनचे बुकिंग करण्यासाठी येथे क्लिक करा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.