तुये येथील श्याम हरमलकर यांनी आपल्या शेतात तूर डाळ उत्त्पन्न घेतलेले आहे. Dainik Gomantak
गोवा

पेडणे तालुक्यातील युवा शेतकऱ्यांचे नवनविन प्रयोग

पारंपारिक शेतीला आता आधुनिक पद्धतीची जोड देत एक एकाच शेतीवर अवलंबून राहण्या पेक्षा आपल्या शेतात विवीध प्रकारचे प्रयोग करून शेतीला प्राधान्य देत असते.

दैनिक गोमन्तक

मोरजी : मुरमुसे तुये येथील स्वतंत्र सैनिक मदन हरमलकर (Madan Harmalkar) यांचे पुत्र श्याम हरमलकर यांनी पुन्हा एकदा आपल्या शेतात (Farm) तूरडाळ झाडांची लागवड करून नवीन शेतकर्‍यांना एक चांगला संदेश (Message) दिलेला आहे. पेडणे (Pernem) तालुक्यातील युवा शेतकरी हळू हळू शेती व्यवसायाकडे लक्ष देत असल्याचे चित्र ग्रामीण भागातून जास्त दिसत आहे. पारंपारिक शेतीला आता आधुनिक पद्धतीची जोड देत एक एकाच शेतीवर अवलंबून राहण्या पेक्षा आपल्या शेतात विवीध प्रकारचे प्रयोग करून शेतीला प्राधान्य देत असते. पेडणे तालुक्यातील अनेक युवा शेतकरी आपापल्या शेतात विविध प्रकारचे वेगवेगळे प्रयोग करत आहेत.

श्याम हरमलकर

तुये येथील श्याम हरमलकर यांनी आपल्या शेतात तूर डाळ उत्त्पन्न घेतलेले आहे. हि शेती करताना त्याला आनंद मिळत असतो. सहा महिन्यात हे पिक मिळायला सुरुवात होते. असे श्याम हरमलकर सांगत असतात. किमान एक ते दीड मीटरच्या अंतरावर हि झाडे लावावी लागतात, एका झाडाची चांगली मेहनत घेतली तर कमीत कमी पावकिलो आणि जास्तीत जास्त एक किलो डाळ मिळते असे श्याम म्हणतो. हि शेती चांगली उत्तपन्न देवू शकते.

तूरडाळ झाडांची लागवड

त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. कष्ठ करावे लागतील, व्यवस्थित खत ओर्गेनिक पद्धतीचा वापर करून करायला हवे . कोणताही शेती व्यवसाय कमकुवत नसतो तो मेहनतीवर अवलंबून असल्याचे सांगितले. शेती व्यवसाय करण्यासाठी सरकारच्या योजनांचा लाभ युवा शेतकर्‍यांनी घ्यायला हवा असे त्यांनी आवाहन केले. हे एक द्विदल धान्य आहे. हे भारतीय लोकांच्या आहारातील एक महत्त्वाचे धान्य आहे. हा एक स्वयंपाकात वरचेवर वापरला जाणारा पदार्थ आहे. याचे वरण बहुतेकजण आवडीने खातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT