Ravi Naik | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Ravi Naik : ‘नागरी पुरवठा’मधील कामचुकारांचा पर्दाफाश

मंत्री नाईकांच्या भेटीत निम्मे कर्मचारी गैरहजर

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजीतील ‘प्रशासन तुमच्या दारी’ या कार्यक्रमानंतर नागरी पुरवठा मंत्री रवी नाईक यांनी जुन्ता हाऊस इमारतीमधील खात्याच्या मुख्यालयाला व पणजीत असलेल्या खात्याच्या धान्यसाठा गोदामात आज अचानक भेट दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाली.

भेटीवेळी कार्यालयातील निम्म्याहून अधिक कर्मचारी कार्यालयात नसल्याने त्याची गंभीर दखल घेतली. खात्यात आवश्‍यकतेपेक्षा अधिक कर्मचारी वर्ग आहे का? याची समिती नेमून चौकशी केली जाईल, अशी माहिती मंत्री रवी नाईक यांनी दिली.

नाईक यांनी नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयातील विविध विभागांत कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांबाबत विचारपूस केली. त्यांच्यासोबत संचालक गोपाळ पार्सेकर होते. काही कर्मचारी कामावर आले नव्हते, तर काही त्यांच्या वरिष्ठांच्या परवानगीशिवाय लवकर निघून गेले असल्‍याचे यावेळी दिसून आले.

नाईक यांनी तिसवाडी धान्यसाठा गोदामालाही भेट दिली व तांदूळ, गव्‍हाची तपासणी केली. हा धान्यसाठा पुढील महिन्यासाठी आला असून त्याच्या दर्जा बद्दल समाधान व्यक्त केले.

खात्यात जो तुरडाळ व साखरेचा घोटाळा झाला, तो कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळेच असल्याचे या एकंदर परिस्थितीवरून दिसून येते.

- रवी नाईक, पुरवठा खात्‍याचे मंत्री

पावसाळ्यापूर्वी गोदामांची दुरुस्‍ती करा

सरकारी गोदामांची अवस्था बिकट आहे. पावसाळ्यापूर्वी गोदामांच्‍या दुरुस्तीसाठी प्रयत्न करावेत, असे आदेश मंत्री नाईक यांनी दिले. या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाकडे त्वरित प्रस्ताव सादर करून पावसाळ्यात या गोदामातील धान्यसाठा खराब होता नये, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही संचालक गोपाळ पार्सेकर यांना केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT