Agonda Beach Dainik Gomantak
गोवा

Agonda Beach: आगोंद किनाऱ्यावर पर्यटन व्यवसाय बंद; संतप्त नागरिकांचा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Agonda Beach protest: आगोंद येथील किनाऱ्यावरील सील करण्यात आलेल्या पर्यटन व्यवसायामुळे त्रस्त नागरिकांनी सोमवारी सकाळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला.

Sameer Amunekar

आगोंद: आगोंद येथील किनाऱ्यावरील सील करण्यात आलेल्या पर्यटन व्यवसायामुळे त्रस्त नागरिकांनी सोमवारी सकाळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. यात टाळे ठोकण्यात आलेले पर्यटन व्यावसायिक व अन्य नागरिकांनी सहभागी झाले होते. आंदोलकांनी उपजिल्हाधिकारी मधू नार्वेकर यांची भेट घेउन आपल्या मागण्याचे निवेदन त्यांना सादर केले.

यावेळी शॅक ओनर्स संघटनेचे धर्मेश सगलानी, आगोंदचे सरपंच नीलेश पागी, सूरज नाईक गावकर, बरसात नाईक गावकर, नगरसेवक सायमन रिबेलो, शुभम कोमरपंत,हेमंत नाईक गावकर, धीरज नाईक गांवकर, पंच रामनाथ वेळीप आदी उपस्थित होते.

हा मोर्चा सरकार विरोधात नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, माजी आमदार विजय पै खोत, सामाजिक कार्यकर्ते शांताजी नाईक गावकर, जनासेन प्रमुख जनार्दन भंडारी, प्रशांत पागी, नगरसेवक शुभम कोमरपंत, सायमन रिबेलो, माजी पोलिस अधीक्षक महेश ना. गावकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र देसाई, हेमंत नाईक गावकर आदींनी आंदोलकांची भेट घेउन पाठिंबा व्यक्त केला.

यावेळी सूरज नाईक गावकर यांनी सांगितले की, टाळे ठोकण्यात आलेल्या आस्थापनांकडे सर्व परवाने आहेत. या विरोधात न्यायालयीन लढाही दिला जाईल. विधानसभेतील ४० ही आमदारांनी या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवावा.

तसेच कायदेशीर आस्थापनांना अभय द्यावे, असे सांगितले. उपाध्यक्ष पंकज नाईक गावकर, गोवा फॉरवर्डचे विकास भगत, सरपंच नीलेश पागी, धर्मेश सगलानी यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT