गोवा

गोवा मासे विक्री व्यवसायातील एजंटांना लंडनहून खंडणीसाठी धमकी? सरदेसाईंच्या आरोपाने खळबळ

मासे विक्री व्यवसायातील एजंटांची परदेशातून सतावणूक होत असल्याचा सरदेसाईंचा आरोप

Pramod Yadav

गोव्यात मासेमारी हा एक प्रमुख व्यवसाय आहे. पण, मासे विक्री व्यवसायातील एजंटांची परदेशातून सतावणूक होत असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. खंडणीसाठी थेट लंडनहून एजंटांना धमकी दिली जात आहे, असा गौप्यस्फोट सरदेसाई यांनी केला आहे.

आमदार विजय सरदेसाई यांच्या वतीने बुधवारी पणजी येथील पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी हा आरोप केला. 'खंडणीबहाद्दर मासे विक्री व्यवसायातील एजंटांना त्यांचे हात वरपर्यंत असल्याची धमकी देत आहेत. खंडणीची मागणी करुन सतावणूक सुरु असल्याचे तक्रार एजंटांनी माझ्याकडे केली,' असे सरदेसाई म्हणाले.

एजंटांनी याबाबत पोलिसांत तक्रार द्यावी असा सल्ला आपण त्यांना दिल्याचे सरदेसाई यावेळी म्हणाले.

लंडनवरुन फोन करुन एजंटांना धमकावले जात आहे, त्याचे फोन नंबर देखील समोर आले आहेत. या फोन नंबरची खातरजमा केल्यानंतर नंबर नक्की कोणाचे आहेत याबाबत माहिती समोर येईल, असे सरदेसाई म्हणाले.

मासे विक्री व्यवसायातील एजंटांना खंडणीसाठी थेट लंडनहून फोन येतो, हे खंडणीबहाद्दर आम्हाल वरिष्ठांचा आशिर्वाद आहे असे सांगतात, त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Municipality: म्हापशातील नोकरभरतीत नियमांचे उल्लंघन! पालिकेतील पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह, 11 कर्मचाऱ्यांची बढती वादाच्या भोऱ्यात

Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

June Lucky Zodiac Signs: व्यापाऱ्यांना बंपर नफा, तर नोकरदारांना प्रमोशन! जून महिन्यात 6 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पैशांचा होणार पाऊस

Goa Politics: गोवा फॉरवर्ड अजूनही काँग्रेस युतीचा घटक! आमची भूमिका निश्चितपणे मांडू- विजय सरदेसाई

RCB Fans Lathi Charge Video: आरसीबीचा विजय फॅन्सच्या अंगाशी! हुल्लडबाजी नडली, पोलिसांनी काठीनं चोप चोप चोपलं; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT