Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Goa: मोपा विमानतळ परिसरात पुन्हा सापडले 'भुयार'

Mopa Airport: पंधरा टन दगड मातीचे 200 ट्रक माती आणि दगड टाकून हे भुयार रात्रभर बुजविण्यात आले

दैनिक गोमन्तक

Mopa: गेल्या चार दिवसांत धावपट्टीपासून अगदी जवळ असे आणखी एक मोठे भुयार सापडल्याने मोपा विमानतळाच्या समस्येत आणखी भर पडली आहे. पंधरा टन दगड मातीचे 200 ट्रक माती व दगड टाकून हे भुयार रात्रभर बुजविण्यात आल्याची माहिती आहे.

डिसेंबर 2021 पासून या विमानतळाच्या सपाटीकरणाचे काम सुरू असताना मोठी भुयारे सापडली असली तरी त्यापैकी एक वारखंड, मोपा (Mopa), कासारवर्णे व चांदेल गाव अशा चार सीमा एकत्र मिळतात. या भागात दुसरे भुयार हे नाण्याचे पाणी-वारखंड गावच्या बाजूने तर तिसरे तुळसकरवाडी-वारखंडच्या दिशेने ज्या भागाला या परिसरात ‘दुकुरलो गुणो’ या नावाने ओळखले जायाचे.

तुळसकरवाडीच्या बाजूने असलेले भुयाराचे तोंड हे सुमारे सात ते आठ फूट उंचीचे होते. भुयाराच्या तोंडावरून जरा पुढे डाव्या व उजव्या अशा दोन बाजुनी याच आकाराची भुयारे गेली आहेत. या अशा भुयारात दगड मारला तर तो दागड कुठे गेला त्याचा आवाजही यायाचा नाही.ह्या सगळ्या भुयारातून एका माणसाला सहजपणे चालत जातस येइल असा आकार आहे. डिसेंबर ते जानेवारी पर्यंत विमानतळाचे काम कराणाऱ्या कंपनीने घाइगडबडीने कुठे वाच्यता होवु नदेता हि सगळी भुयारे एकामागे एक करून दगड व माती घालून बुझवुन टाकली.

भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन शासनाने या प्रकरणी जाणिवपूर्वक लक्ष द्यावे, अशी मागणी मोपा विमानतळ(Mopa Airport) पंचक्रोशी जन संघटनेचे निमंत्रक उदय महाले आणि सचिव बाया वरक यांनी केली आहे. मोपा पठारावर अनेकदा भुयार आढळून आली आहेत. त्यामुळे या ठिकाणी भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो, असेही महाले म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माणिकला वाचविण्यासाठी तातडीने पाऊले उचला; 59 वर्षीय हत्तीला उपचारासाठी वनतारामध्ये हलवा, हायकोर्टाची गोवा सरकारला सूचना

भारतीय हवाईदलाच्या विमानांनी 18 डिसेंबरच्या पहाटे दाबोळी विमानतळावर बॉम्बवर्षाव करून 'गोवा मुक्ती मोहिमे'चा शुभारंभ केला..

अग्रलेख: ज्या स्वातंत्र्यासाठी गोमंतकीयांनी रक्त सांडले, त्याच 'गोव्यात' आज मूळ गोमंतकीयांना जगण्यासाठी देश सोडावा लागत आहे..

Goa News Live: गोवा इतर राज्यांच्या तुलनेत खूप पुढे; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Goa ZP Election: भाजप-मगोसमोर भाटीकरांचे आव्हान? कुर्टी झेडपीसाठी ‘आप’सह काँग्रेसही रिंगणात; फोंडा पोटनिवडणुकीवर डोळा

SCROLL FOR NEXT