Brenden Valentine Crasto, a long-term resident of Goa, has been granted Indian Citizenship. Pramod Sawant X Account
गोवा

फाळणीपूर्वी पाकिस्तानला गेले, 1981 मध्ये पुन्हा गोव्यात आले; 44 वर्षाच्या संघर्षानंतर मिळाले भारतीय नागरिकत्व

Citizenship Amendment Act: ब्रँडन वेलंटिन क्रॅस्टो यांनी गोमंतकीय महिलेशी लग्न केल्यानंतर ते २००६ पासून गोव्यातच राहत आहेत.

Pramod Yadav

पणजी: सीएए कायद्यांर्गत गोव्यात पाकिस्तानी नागरिकाला भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले. मूळ गोमंतकीय असणाऱ्या ब्रँडन वेलंटिन क्रॅस्टो यांना ४४ वर्षांच्या संघर्षानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते नागरिकत्व बहाल करण्यात आले. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यांर्गत (सीएए) गोव्यात आत्तापर्यंत तीन जणांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले.

ब्रँडन वेलंटिन क्रॅस्टो यांनी गोमंतकीय महिलेशी लग्न केल्यानंतर ते २००६ पासून गोव्यातच राहत आहेत. क्रॅस्टो यांचे आजोबा भारताच्या फाळणीपूर्वी (१९४६) पाकिस्तानमध्ये स्थलांतरीत झाले, त्यानंतर१९४७ रोजी फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची निर्मिती झाली. दरम्यान, १९८१ मध्ये क्रॅस्टो यांचे आई – वडील पुन्हा गोव्यात हणजूण येथे त्यांच्या मालमत्तेत राहण्यास आले. तेव्हापासून क्रॅस्टो यांचा भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी संघर्ष सुरु होता.

अखेर ४४ वर्षांच्या संघर्षानंतर क्रॅस्टो यांना भारतीय नागरिकत्व मिळाले. क्रॅस्टो यांच्या भारतीय नागरिकत्व मिळाले ही त्यांच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

भारतीय नागरिकत्व दुरुस्ती कायद्यांर्गत ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात आलेल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश येथील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि कॅथलिक नागरिक भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत, असेही सावंत म्हणाले.

यापूर्वी दोन पाकिस्तानी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले असून, गोव्यात आत्तापर्यंत एकूण तीन नागरिकांना सीएए अंतर्गत भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकत्वासाठी केलेला सध्या एक अर्ज प्रलंबित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT