Illegal liquor  Dainik Gomantak
गोवा

Anmod Checkpost : महाराष्ट्रनंतर आता कर्नाटक चेकपोस्टवर 13 लाखांची दारु जप्त

अवैध दारु वाहतुक प्रकरणी एकाला अटक

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा राज्यातून अवैधरित्या परराज्यात दारु वाहतुकीवर बंदी आहे. परंतु बंदी असतानाही दारु वाहतूक होत असल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. दारु वाहतूक करताना आरोपींकडून वेगवेगळ्या पध्दतींचा वापर केला जातो. काही दिवसांपूर्वी पत्रादेवी चेकनाक्यावर अंदाजे 40 लाख रुपयांचा दारु साठा जप्त करण्यात आला होता. अशातच आज शनिवारी सकाळी अनमोड येथील अबकारी चेकपोस्टवर 13 लाखांहून अधिक किमतींचा दारुसाठा जप्त करण्यात आला.

गोवा कर्नाटक सीमेवरील अनमोड येथे अवैधरित्या परराज्यात दारु वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 13 लाखांहून अधिक किंमतीचा दारुसाठा जप्त करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळी GA 05 T 5095 या क्रमांंकाचा ट्रक अनमोड येथील अबकारी चेकपोस्टवर तपासणीसाठी थांबविण्यात आला. तपासणी दरम्यान ट्रकमध्ये विविध ब्रॅंड्सची गोवा बनावटीची 57 लीटर दारु आढळून आली. या दारुची किंमत 13 लाख 15 हजार इतकी असल्याची माहिती समोर आली आहे.

अनमोड येथील अबकारी चेकपोस्टवर एका ट्रकमध्ये दारु साठा जप्त करण्यात आला आहे. GA 05 T 5095 या ट्रकमधून गोव्यातून धारवाढ येथे ही अवैध दारु नेली जात होती. याप्रकरणी धारवाड येथील शिवानंद मेट्टीन याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पत्रादेवी चेकनाक्यावर खुर्च्या पुरवठा करणाऱ्या एका ट्रकमध्ये दारु साठा जप्त करण्यात आला होता. या कारवाईत तब्बल 40 लाखांची दारु जप्त केली असल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT