Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: दिल्ली पराभवानंतर आम आदमीचा 'टॉप गिअर'; पक्षाच्या बड्या नेत्यांकडे गोव्यासह विविध राज्यांची जबाबदारी

Aam Admi Party News: दिल्लीत पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री आतिषी यांच्यावर असणार आहे.

Pramod Yadav

पणजी: दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आम आदमी पक्ष संघटनेतील बदलाबाबत गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने बैठका घेत आहे. या बैठकांच्या माध्यमातून संघटनेत काही बदल करण्याची आम आदमी पार्टीची रणनीती आहे. आगामी काळात काही राज्यांत होणाऱ्या निवडणुका विचारात घेता हा बदल करण्यात येत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आम आदमीच्या बैठकीनंतर पक्षाने काही नवे निर्णय घेतले आहेत. पक्षाच्या सर्व बड्या नेत्यांची वेगवेगळ्या राज्यात नियुक्ती करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. विशेषत: ज्या राज्यांमध्ये आम आदमी पक्षाला भविष्यात मोठ्या आशा आहेत त्या राज्यांमध्ये या नेत्यांना तैनात करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.

माजी मुख्यमंत्री आतिशी यांच्याकडे दिल्लीची जबाबदारी

विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका चोख पार पाडणे असो किंवा दिल्लीत पक्ष मजबूत करणे या दोन्ही जबाबदाऱ्या आतिषी यांच्यावर असणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पंजाबमध्ये मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन

पंजाब हे आम आदमी पक्षासाठी दुसरे महत्त्वाचे राज्य आहे. पंजाबमध्ये सध्या आम आदमी पक्षाचे सरकार असून, दोन वर्षांनी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पक्षाला पंजाब कोणत्याही परिस्थितीत जाऊ द्यायचा नाही.

यामुळे पक्षाच्या हायकमांडने पंजाबची जबाबदारी दोन ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्याकडे सोपवली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

गोपाल राय आणि दुर्गेश पाठक यांची गुजरातसाठी निवड

आम आदमी पक्षाची नजर गुजरातवर असून, गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने गुजरातमध्ये पाच जागा जिंकल्या होत्या. आगामी विधानसभा निवडणुकीत चांगले निकाल मिळविण्यासाठी आम आदमी पक्षाने आपले दोन ज्येष्ठ नेते गोपाल राय आणि दुर्गेश पाठक यांची गुजरातसाठी निवड केली आहे. हे दोघेही गुजरात युनिटसोबत रणनीती तयार करतील.

गोव्यासाठी सौरभ भारद्वाज आणि दुर्गेश पाठक यांची निवड

गोवा आम आदमी पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. गोव्यात आम आदमी पक्षाचे दोन आमदार आहेत. गोव्यातील पक्षाची स्थिती सुधारण्यासाठी हायकमांडने सौरभ भारद्वाज आणि दुर्गेश पाठक यांची निवड केली आहे.

पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय सिंह हे आधीच उत्तर प्रदेशची जबाबदारी सांभाळत आहेत. यावेळी त्यांच्यासह दिलीप पांडे यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्याचा निर्णय हायकमांडने घेतला आहे.

पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवालही वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. केजरीवाल देशभरात फिरून आम आदमी पार्टीची स्थिती अधिक चांगली करण्यासाठी विविध ठिकाणांना भेट देतील. याठिकाणी जोरदार प्रचाराचे काम ते करतील. दरम्यान, येत्या दोन वर्षांत अरविंद केजरीवाल हे पंजाबमध्ये अधिक सक्रिय असतील हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT