Congress Dainik Gomantak
गोवा

सत्तेवर आल्यास आम्ही राज्य पातळीवर ओपिनियन पोल दिवस साजरा करु: काँग्रेस

ओपिनियन पोल दिवस हा गोव्याचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे, त्यामुळे तो दिवस राज्यस्तरावर साजरा केला पाहिजे, असे मत काँग्रेस (Congress) नेते मायकल लोबो यांनी रविवारी व्यक्त केले.

दैनिक गोमन्तक

पणजी : ओपिनियन पोल दिवस हा गोव्याचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे, त्यामुळे तो दिवस राज्यस्तरावर साजरा केला पाहिजे, असे मत काँग्रेस नेते मायकल लोबो (Michael Lobo) यांनी रविवारी व्यक्त केले. "आम्ही सत्तेवर आल्यास राज्य पातळीवर ओपिनियन पोल दिवस साजरा करू." असे लोबो यांनी आश्वासन दिले.

काँग्रेस (Congress) नेत्यांनी रविवारी पणजी कार्यालयात ओपिनियन पोल दिवस साजरा केला. यावेळी खासदार फ्रान्सिस सार्दिन, माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, महिला अध्यक्षा बीना नाईक, ज्यो डायस, दिलीप बोरकर आदी उपस्थित होते.

“गोव्याची (Goa) अस्मिता जपण्यासाठी लढलेल्या नेत्यांचा आपण आदर केला पाहिजे आणि त्यांचे स्मरण केले पाहिजे. सरकारने हा दिवस राज्यस्तरावर साजरा करावा, अशी माझी नेहमीच इच्छा होती. पण भाजपने ते कधीच ऐकले नाही.’’ असे लोबो म्हणाले.

फ्रान्सिस सार्दिन म्हणाले की, गोवा महाराष्ट्रात (Maharashtra) विलीन झाला असता तर फक्त एक जिल्हा म्हणून राहिला असता. गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण झाले असते तर आम्हाला आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली नसती. राज्य आणि लोकहिताच्या विरोधात काम करणाऱ्या भाजपचा पराभव करा, असे आवाहन त्यांनी गोव्यातील जनतेला केले. एदुआर्द फालेरो यांनीही गोव्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. "माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांनी गोव्याचे हित जपण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती." असे ते म्हणाले.

दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) म्हणाले की, हा ऐतिहासिक दिवस असून तो साजरा करायला हवा. “गोव्याचा इतिहास, संस्कृती, भाषा आणि इतर पैलू अद्वितीय आहेत. पण गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण झाले असते तर ते सगळे नश्ट झाले असते.’’ असे राव म्हणाले.

“सर्वात महत्त्वाचे म्हणजे विलीनीकरण मागणाऱ्या आणि विलीनीकरणाच्या विरोधात असलेल्या दोन्ही गटांनी, जनमत कौल झाल्यावर राज्याच्या हितासाठी काम केले. ही देखील एक अनोखी गोष्ट आहे.” असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT