Lohia Ground Goa Dainik Gomantak
गोवा

दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा साजरा होणार लोहिया मैदानावर क्रांतीदिन

मैदानाला नवा साज : मॉविन गुदिन्हो वाहणार श्रद्धांजली

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : दोन वर्षांच्या खंडा नंतर यंदा पुन्हा एकदा मडगाव येथील ऐतिहासिक महत्व असलेल्या लोहिया मैदानावर क्रांतिदिन सोहळा उद्या 18 जून रोजी संपन्न होणार असून पंचायतमंत्री मॉव्हीन गुडीन्हो हे लोहियांच्या पुतळ्याला हार अर्पून श्रद्धांजली वाहणार आहेत.

कोविडमुळे मागची दोन वर्षे या मैदानावर हा सोहळा साजरा करण्याचे सोपस्कार पार पाडले जायचे मात्र यंदा हा सोहळा पूर्ण जोमाने साजरा केला जाणार असून सकाळी गोवा मुक्ती चळवळीत आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना मानवंदना दिल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती क्रांतिदिन सोहळा समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर यांनी दिली.

76 वर्षांपूर्वी गोव्यात विश्रांती घेण्यासाठी आलेले डॉ. राम मनोहर लोहिया यांनी 18 जून 1946 या दिवशी पोर्तुगीज सरकारचा भाषण बंदीचा हुकूम मोडून गोव्यात मुक्तीसाठीच्या क्रांतीची सुरवात याच ऐतिहासिक मैदानावरून केली होती. त्याच दिवसाची आठवण म्हणून आता हा क्रांतिदिन साजरा केला जात आहे.

येथील लोहिया मैदानाला नवा साज चढविण्यात आला असून शुक्रवारी सायंकाळपर्यंत या मैदानाच्या सजावटीवर शेवटचा हात फिरवत असल्याचे दृश्य दिसत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT