Road Development Work | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Belagavi Road: 10 वर्षांचा खडतर 'प्रवास' संपणार, चोर्ला घाटातून जाणाऱ्या बेळगाव - गोवा मार्गाच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात

Belgaum-Goa Road Repair Update: ५१ किलोमीटरच्या या मार्गात विविध ठिकाणी असलेल्या खड्यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता.

Pramod Yadav

Goa Belagavi Road

सत्तरी: चोर्ला घाटातून बेळगावला जोडणाऱ्या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. खड्डे आणि अनियमित रस्त्यामुळे या मार्गावर प्रवासाला अडथळा येत होता. दरम्यान, काम पूर्ण झाल्यास गोवा- कर्नाटक - गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत या मार्गाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कर्नाटक सार्वजनिक बांधकाम विभागाने चोर्ला घाटातीला रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला गती दिली आहे. गेल्या दहा वर्षापासून या मार्गाची अवस्था दयनीय झाली होती. ५१ किलोमीटरच्या या मार्गात विविध ठिकाणी असलेल्या खड्यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील प्रवास सुखर होणार आहे.

दुरुस्तीसह विभागाने या मार्गावर मलप्रभा नदीवर पुलाच्या उभारणीची देखील तयारी सुरु केली आहे. ब्रिटीश काळात उभारलेला पूल पाडून त्याठिकाणी नवा पूल उभारला जात आहे. कर्नाटक बांधकाम विभागाने गेल्यावर्षी या मार्गाच्या दुरुस्तीसाठी ५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. कर्नाटक सीमा लगतच्या ४३.३८१ किमी मार्गाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

महामार्गाची वैशिष्ट्ये

- चोर्ला घाटातून बेळगाव - गोवा हा ५१ किलोमीटरचा मार्ग फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होईल.

- दुरुस्ती आणि कार्पेटींगचे काम वॉर फुटींगवर घेण्यात आले आहे.

- मलप्रभा नदीवर पूलाची उभारणी केली जाणार.

- मार्ग पूर्ण झाल्यानंतर पर्यटन, व्यापाराला चालना मिळेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT