Goa illegal Hoarding dainik gomantak
गोवा

Illegal Hoardings: बेकायदा होर्डिंग्ज हटवण्याची महापालिकेची न्यायालयात ग्वाही

Illegal Hoardings: सांतिनेज येथील जंक्शनवरील ‘मिश्रा पेढा’चे बेकायदेशीर मोठे होर्डिंग्स लावण्यात आले असून त्याविरुद्ध कोणतीच कारवाई (सीसीपी) महापालिकेकडून होत नाही

दैनिक गोमन्तक

Illegal Hoardings: सांतिनेज येथील जंक्शनवरील ‘मिश्रा पेढा’चे बेकायदेशीर मोठे होर्डिंग्स लावण्यात आले असून त्याविरुद्ध कोणतीच कारवाई (सीसीपी) महापालिकेकडून होत नाही, असे आज स्वेच्छा याचिकेवरील सुनावणीवेळी निदर्शनास आणून दिले असता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने त्याचा जाब विचारला.

महापालिकेच्या वकिलांनी हे होर्डिंग्स त्वरित हटवण्याची ग्वाही खंडपीठाला दिली. त्यामुळे आज दुपारी त्याची कारवाई करण्यात आली. गोवा खंडपीठाच्या तोंडी निर्देशानंतर या होर्डिंग्सबाबत महापालिकेला जाग आली आहे.

गोवा खंडपीठाने पणजी तसेच राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील बेकायदा होर्डिंग्स संदर्भात स्वेच्छा दखल घेतली आहे,त्यावरील सुनावणी आज झाली. सांतिनेज जंक्शनवरील एका एलईडी होर्डिंग्सविरुद्ध ‘सीसीपी’ला कारवाईचे निर्देश दिले होते. त्यासंदर्भात पालिका संचालनालयाकडे सुनावणी प्रलंबित आहे. ती आता 12 ऑक्टोबरला ठेवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

SCROLL FOR NEXT